Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरावरील उपाययोजनांचा प्रस्ताव तात्काळ सादर करा..... पालकमंत्री सतेज पाटील

पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 18, 2021
411 5
0
571
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड व्यवसायात करिअर करण्याची संधी

Gandhi Teerth – Jain Hills

राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम

औरंगाबाद ५२ दरवाजांचे शहर. ऐतिहासिक,  सामाजिक,  सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा,  पानचक्की,  दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात. इथल्या वास्तूकलांचा,  इतिहासाचा अभ्यास करतात. संशोधन करतात. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावतात ते गाईड. या टुरिस्ट गाईड व्यवसायात करिअर करण्याची संधी पर्यटन संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. या व्यवसायावर प्रकाश टाकणारा हा लेख.

‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण,  सक्षम, चतूर,  क्षमाशील, समंजस असे गुणही असणे महत्त्वाचे असते. यातूनच आदरातिथ्याचे दर्शन घडते. त्याचबरोबर राज्य, देशातील घडामोडींवर बारकाईने, अचूक लक्ष ठेऊन पर्यटकांना नवनवीन माहिती देणे आवश्यक असते. इथल्या संस्कृती,  परंपरा,  लहेजा, सवयी समजून इतरांपर्यत सकारात्मक पैलू पोहोचवावे लागतात. त्यामुळे स्थानिक – पर्यटकांमध्ये आदरभाव निर्माण होण्यास मदत होते. वेळेच पालन, टापटीप राहणी,  प्रामाणिकपणा, प्रसन्न वेशभूषा, सुसंस्कृत वर्तणूक, शांत स्वभाव कामाप्रती निष्ठा असणेही गाईडसाठी अन् राज्य-देशासाठी महत्त्वाचे आहे. या निष्ठेतूनच देशाची प्रतिमा उंचावली,  साकारली जाते. पर्यटक, आपला ग्राहक आहे. ग्राहक नेहमीच बरोबर असतो हे सूत्र मनात ठेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागावे. त्यांचा प्रवास समाधानकारक होण्यामध्ये गाईडची भूमिका मोलाचीच असते. पर्यटकांसाठी गाईडचा थेट संबंध येत असल्याने राज्य, देशाची प्रतिमा उंचावण्याचं कार्य जबाबदारीने ‘गाईड’ ला पार पाडावे लागते.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. पर्यटन संचालनालयाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

गाईड होण्यासाठी 18 ते 40  वय, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  40 वयाखालील  इच्छुकांसाठी किमान बारावी, 40 वरील इच्छुकांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  शारीरिकदृष्ट्या सक्षम, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबत अत्यंत उत्साही असल्यासच या व्यवसायाकडे वळणे मात्र उत्तम. पर्यटकांसोबत उत्तम संवाद साधण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेचे ज्ञान असायलाच हवे. प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुढे टूर गाईडमधून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येते. अशाप्रकारे ‘टुरिस्ट गाईड’ व्यवसायात पर्यटकांची सेवा आणि समाधानातून रोजगारप्राप्ती करता येते. त्यामुळे इच्छुकांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून बघितल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होण्यास मदतच होईल.

ही संधी औरंगाबादच्या पर्यटन संचालनालयाने तरूणांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी इच्छुकांनी  https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या लिंकवरून 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करावा आणि नोंदणीकृत गाईड होऊन पर्यटन क्षेत्रातील नामांकित, अभ्यासू गाईड बनावे.

-डॉ.श्याम टरके, माहिती सहायक, माहिती केंद्र, औरंगाबाद. (मो.क्र.9860078988)

Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentratnagiri tourismपर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In