Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

'भाऊंना भावांजली' महोत्सवांतर्गत 'लाॅकडाऊन डायरी' चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

पर्यटन व्यवसायात व्हा ‘गाईड’

मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 17, 2021
409 4
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पर्यटनदृष्ट्या माहिम किल्ला परिसराचा होणार विकास

Gandhi Teerth – Jain Hills

मुंबई, दि. 15 : मुंबईच्या विकासासाठी सुरू असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्प दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावेत, या अनुषंगाने पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे या प्रकल्पांचा नियमित आढावा घेतात. आज त्यांनी दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविणे, वरळी-शिवडी जोडरस्ता तसेच माहिम किल्ला परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास या कामांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

पश्चिम एक्सप्रेस हायवेवर मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाका परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री श्री.आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांसमवेत या कामांचा आढावा घेतला. येथे बहुतांश उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत. मेट्रो 9 पियर आणि रिसरफेसिंगचे सध्या सुरू असलेले काम पुढील काही दिवसांमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितच येथील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी नागरिक आणि प्रकल्पबाधितांच्या उपस्थित केलेल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधितांना सूचना केल्या. हा प्रकल्प मध्य मुंबईतील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड सोबतच पूर्ण होणे गरजेचे असल्याने कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

माहिम रेतीबंदर परिसराचा नुकताच पर्यटनदृष्ट्या कायापालट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माहिम किल्ल्याचाही विकास करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.

या बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकर, अजय चौधरी, नगरसेवक श्रीमती श्रद्धा जाधव, श्रीमती उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. सत्यनारायण, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

Tags: aditya thakreagro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismplaces to see in maharashtraratnagiri tourismविकास प्रकल्प
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In