Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

ठाणे खाडी परिसराला आंतरराष्ट्रीय रामसर क्षेत्र म्हणून मान्यतेसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा प्राधान्याने विकास करण्यासाठी प्रयत्नशील

गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 13, 2021
406 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते गौरव

Gandhi Tirtha – Jain Hills

जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ या वास्तूला ग्रीन बिल्डींग संबंधीचा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व टेरी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ग्रीहा’ या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय स्थान निर्माण करणाऱ्या सद्यस्थितील इमारतींसाठीचा ग्रिहा एक्झम्पलरी परफॉर्मन्ससाठीचा देशातील पहिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या मार्गोसा लॉन येथे दि.10 डिसेंबर ला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

गांधी रिसर्च फाउंडेशन ला शाश्वत बांधकाम साहित्य-तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक इमारत उभी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनचे सिव्हील विभागाचे आशिष भिरूड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपिठावर नार्वेचे भारतीय राजदूत हॅन्स जॅकोब फ्रीडनलंड, डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी सॅने, सेंट गोबेन इंडिया प्रा. लि. चे मुख्य राष्ट्रीय अधिकारी आनंद संथानम, ग्रिहा (GRIHA) कौन्सीलच्या अध्यक्षा डॉ. विभा धवन, ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, युनायटेड नेशनच्या भारताचे पर्यावरण प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती दिव्या दत्त उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. विभा धवन यांनी केले तर ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ यांनी परिचय करून दिला.

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार युवापिढीवर संस्कारीत व्हावे या उद्देशाने संस्थापक भवरलाल जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. ‘सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे’ या भवरलाल जैन यांच्या विचारांच्या आधारावरच दि. 25 मार्च 2012 ला गांधीतीर्थ निर्माण केले आहे. जागतिक दर्जाचे आॕडिओ गाईडेड म्युझियमच्या माध्यमातून गांधी विचार समजून घेण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्रिहा पुरस्कार प्राप्त इमारतीमध्ये पुर्णपणे अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यात आला असून या पुर्ण इमारती व परिसराचे रेनवॉटर हार्वेस्टींग केलेले आहे. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सौर तंत्रज्ञानाचा वापर करीत पाण्याच्या काटेकोर वापराकडेही सुरुवातीपासून लक्ष देण्यात आले आहे. यामुळेच गांधी रिसर्च फाऊंडेशनला ग्रीहा पुरस्काराने गौरविण्यात आले.

Tags: GandhiGandhi TirthaIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMahatma Gandhiratnagiri tourismगांधी रिसर्च फाऊंडेशन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In