Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

वन्यजीवांच्या संवर्धनासह वनपर्यटनातून ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्राचा विकास साधणार.... पालकमंत्री छगन भुजबळ

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर कडक निर्बंध

भाविकांसाठी धार्मिक पर्यटन क्षेत्राचा विकास करणार… पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 29, 2021
404 4
0
562
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वढा येथे ‘प्रती पंढरी’ साक्षात उभी करण्याचा मानस

Gandhi Tirtha – Jain Hills

चंद्रपूर : धार्मिक तिर्थस्थळे ही माणसांना जोडणारी ठिकाणे असून विविध जातीधर्माचे नागरीक दर्शनाला एकत्र येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये एकोपा निर्माण होण्यास मदत होते. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील अंबिका माता व एल्लमा मातेचे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना मनापासून आनंद होत आहे. भाविकांसाठी अशा धार्मिक पर्यटन क्षेत्राचा विकास करून नागरिकांना येथे पर्यटनाच्यादृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे विचार मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

गुंजेवाही येथे परिसरातील अंतर्गत रस्ता व सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरकार, पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार, गुंजेवाहीचे सरपंच वसंता टेकाम, अंबिका माता देवस्थानचे अध्यक्ष सुरेश गुणशेट्टीवार, पोलिस पाटील वंदना चन्नावार, विरेंद्र जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, सीमा सहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता माधवराव गावड, सहाय्यक अभियंता क्षितिजा शिंदे आदी उपस्थित होते.

चंद्रपूरजवळ वर्धा – पैनगंगा नदीच्या संगमावर असलेल्या वढा तिर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, वढा येथे ‘प्रती पंढरी’ साक्षात उभी करण्याचा आपला मानस आहे. पर्यटनाच्यादृष्टीने आकर्षक असलेल्या धार्मिक स्थळांना विकसीत करणे, त्याचा दर्जा वाढविणे याला आपले प्राधान्य आहे. गुंजेवाही येथील अंबिका माता देवस्थानातसुध्दा अनेक भाविक येत असतात. त्यामुळे येथील परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी अतिरिक्त 50 लक्ष रुपयाचा निधी देऊ. तसेच पुढील वर्षी एक कोटीची तरतूद करण्यात येईल. लोकांच्या कायम स्मरणात राहील असा विकास करून दाखवू. मात्र त्यासाठी स्थानिकांनीसुध्दा आग्रही असले पाहिजे. तसेच आपल्या परिसराचा विकास व्हावा, यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसला पाहिजे.

कोरोनामुळे काही काळ विकासात्मक कामाची गती संथ होती. मात्र, आता विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने निधी उपलब्ध करून देण्याची गावकऱ्यांची मागणी होती. सावरगाव- मरेगाव- गुंजेवाही- पवनार- टेकरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. तसेच गुंजेवाही येथील अंबिका माता देवस्थान व येल्लमा देवी परिसरातील सामाजिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. या दोन्ही कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. येथे तयार होणाऱ्या सामाजिक सभागृहात 500 ते 700 लोकांच्या क्षमतेचे समारंभ, धार्मिक कार्यक्रम इत्यादी होऊ शकेल. सर्व सोयीसुविधा युक्त सभागृह बांधण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहे. तसेच सभागृह बांधून पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सिंदेवाही तालुक्यातील पवनचक आणि कोटा येथे काँक्रीट रस्त्याचे भुमिपूजन (प्रत्येकी 10 लक्ष रुपये), गुंजेवाही येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचे भुमिपूजन (30 लक्ष), सावरगाटा – मरेगांव – गुंजेवाही – पवनार – टेकरी रस्ता दुरुस्ती (6 कोटी) कामाचे भुमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पवनाचकचे सरपंच श्रीरंग चौधरी, कोटाच्या उपसरपंचा शलिनी गुरुनुले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismविजय वडेट्टीवार
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In