Wednesday, September 16, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आपले पूर्वांचल हे पुस्तक मोहन बने यांच्या छायाचित्रणातील अमृतमंथनाचे नवनीत… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नयनरम्य दिव्यांनी उजळला कृष्णामाईचा घाट

रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनदृष्ट्या विकसित करणार.... पालकमंत्री विजय वडेट्टीवार

आपले पूर्वांचल हे पुस्तक मोहन बने यांच्या छायाचित्रणातील अमृतमंथनाचे नवनीत… राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 25, 2021
411 4
0
571
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रणाचा समावेश

मुंबई : ‘स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या  छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी (दि. २१) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.  सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर व इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे मुद्रक आनंद लिमये यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. हे पुस्तक गौरधन व्हिजनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

मोहन बने यांनी केवळ पर्यटकाच्या दृष्टिकोनातून पूर्वोत्तर राज्यांचे छायाचित्रण केले नसून त्यांनी त्या प्रदेशाशी व तेथील जनसामान्यांशी तादात्म्य होऊन समर्पण भावनेने लिहिल्यामुळे त्यांचे पुस्तक प्रेरणादायी झाले आहे असे राज्यपालांनी सांगितले.’आपले पूर्वांचल’ सारखी चांगली पुस्तके समाजापुढे आली पाहिजे तसेच  मोहन बने यांच्या कॅमेरातून व प्रतिभेतून अधिकाधिक चांगल्या कृती समाजासमोर आल्या पाहिजे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी घोडवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील सरपंच वैदेही वैभव बने, शिल्पकार शशी वडके, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या रश्मी महेश विचारे तसेच ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व मोहन बने यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentratnagiri tourismअमृतमंथनआपले पूर्वांचलमहापर्यटनमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमोहन बनेराज्यपाल
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In