Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

‘दिलखुलास कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची उद्या मुलाखत

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान

सावित्री नदीच्या पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवाल तातडीने सादर करावा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 11, 2021
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाड शहरात भविष्यातील पूरसदृष्य परिस्थिती टाळण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

Gandhi Tirtha – Jain Hills

मुंबई : महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावा, गाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेख, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोके, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते.  याचबरोबर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, या वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगड, माती, वाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.

नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismबाळासाहेब थोरातमहसूल मंत्रीमहाडसावित्री नदी
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In