Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
द डेअर व्हेंचरची सी रॉक मरीन सफारी

Diveagar, Raigad

चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित करण्यासाठी प्रयत्न... मुख्यमंत्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त 'जागतिक अहिंसा दिन' कार्यक्रम

द डेअर व्हेंचरची सी रॉक मरीन सफारी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 18, 2021
572 5
0
794
SHARES
3.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोकणात पहिल्यांदाच एक रोमांचकारी आणि सुरक्षित, खुली समुद्री बोट राइड

Gandhi Teerth – Jalgaon

रम्य स्वच्छ आणि निवांत समुद्रकिनारा लाभलेले रायगड जिल्ह्यातील नितांत सुंदर आणि छोटेखानी गाव म्हणजे दिवेआगर (Diveagar) . दिवेआगर हे गाव प्रसिद्धीस आलं ते इथे सापडलेल्या सुवर्ण गणेशामुळे. आरावी, वाळवटी, शेखाडी, भरडखोल (Bharadkhol) हि आजूबाजूची गावे. दिवेआगरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले भरडखोल हे गाव पर्यटकांसाठी थोडे अपरिचितच. इथे असलेल्या समुद्र किनाऱ्यावर पाण्यातून वर आलेला एक दगडी स्तंभ सी रॉक म्हणून ओळखला जातो. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी पर्यटन तज्ज्ञ पराग पिंपळे आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी एकत्र एक स्तुत्य अश्या डेअरव्हेंचरची सी रॉक मरीन सफारी नियोजन करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. पराग पिंपळे आणि ग्रुपने गावकऱ्यांच्या सहकार्य आणि सक्रिय सहभागाने हि फेरी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. भरडखोल येथून या सी रॉक पर्यंत खुल्या समुद्रात हि साहसी सफर घडवली जाते. हि सेवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड द्वारा मान्यता प्राप्त करण्यात अली आहे. रोमांच, उत्कंठा, साहस आणि थराराने परीपूर्ण असलेल्या या सी रॉक मरीन सफारी बद्दल पराग पिंपळे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.

द डेअर व्हेंचरची सी रॉक मरीन सफर हि दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिली सफर आहे अर्धा ते पाऊण तासांची तर दुसरी आहे हायर बोट सफारी जी दोन तासांची असते.

अंदाजे तीस ते चाळीस मिनिटांची थ्रिलिंग सफर : दिवेआगर जवळील भरडखोल किनाऱ्यावरून सफारी निघाल्यावर पश्चिमेकडे खोल समुद्रात तिची वाटचाल सुरु होते. किनाऱ्याकडे प्रचंड ओढीने आदळणाऱ्या मोठाल्या लाटांच्या विरुद्ध दिशेने प्रवास होत असल्याने बोट हेलकावे खातच निघते आणि खर्या थराराच्या अनुभवास इथूनच सुरुवात होते. पश्चिमेकडून येणारा प्रचंड हवेचा जोर आणि मोठमोठाल्या लाटांच्या गतीने वरखाली डुचमळणाऱ्या नावेतून जात असतांना पर्यटकांना प्रचंड थ्रिल अनुभवता येतो. आपण खोल खोल समुद्रात आत कुठेतरी चाललो आहोत हा अनुभव खूपच थरारक असतो. हवा आणि लाटांच्या विरोध करत सफर सुरु असतांना एक किलोमीटर अंतर समुद्रात गेल्यावर डावीकडे वळून म्हणजेच दक्षिणेकडे बोट दिशा बदलवते. उजवीकडे अथांग समुद्र आणि डावीकडे लांबवर दिसणारा विस्तीर्ण समुद्र किनारा लहानलहान घरे दृष्टीस पडतात. आता आपल्या बोटीचा प्रवास किनारा आणि समुद्र यांच्या मधून समांतर सुरु होतो. या सफरीत डावीकडे दिवेआगर, आदगाव, वेळास आगर (दापोलीतले वेळास वेगळे) हि लहानलहान गावे आणि समुद्र किनाऱ्याचे लांबूनच दिसणारे दृश्य अतिशय मनोभावी असेच असते. या प्रवासात आजूबाजूला डॉल्फिन आणि सीगल पक्षांचा वावर, मच्छीमारी करणाऱ्या छोट्यामोठ्या नौका, एखादा कोळी बांधव समुद्रात जाळे टाकतांनाची दृश्य सर्रास बघायला मिळते. हि सफर अंदाजे पस्तीस ते चाळीस मिनिटात पूर्ण होते.

सफारी दरम्यान दाखवण्यात येणारे पॉईंट्स : सी रॉक – पुढे सफर सुरु असतांना पहिला पॉईंट लागतो तो सी रॉक. भरसमुद्रात अंदाजे चाळीस फूट उंच असणाऱ्या या सी रॉकच्या तीन बाजूस पाण्यात वेढलेला खडकाळ बेटसदृश्य भाग आहे. समुद्राला ओहोटी असल्यास आपण हे ठिकाण जवळ जाऊन बघू शकत नाही. भरती असल्यास मात्र आपण या खडकाच्या शक्य तेव्हड्या जवळ जाऊन तो बघू शकतो.

आरडीएक्स (RDX) पॉईंट – या सी रॉक खडकाला अर्धवर्तुळाकार फेरी मारतांना आपल्या आरडीएक्स पॉईंट म्हणून प्रसिद्ध (कि कुप्रसिद्ध) असलेला भाग दाखवला जातो. .
१३ मार्च १९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्ट. देशासह महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस. देशविघातक कृत्य करणाऱ्या अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला, शेकडो लोक जखमी झाले होते. कालांतराने घटनेतील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. या विध्वंसकारी साखळी बॉम्ब स्फोटात वापरण्यात आलेली स्फोटके म्हणजेच आरडीएक्स (RDX) ज्या किनाऱ्यावर उतरवण्यात आली होती तोच हा किनारा. लांबूनच या पॉईन्टचे दर्शन आपल्याला घडवण्यात येते. दृश्य बघून झाल्यावर आपल्या बोटीचा परतीचा प्रवास सुरु होतो.

परतीचा प्रवास : अंदाजे ३५ ते ४० मिनिटात आपली सी रॉक मरीन सफारी पूर्ण होते. बोट किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करते. प्रचंड वेगात वाहणारा वारा आणि लाटांची दिशा अनुकूल असल्याने परतीचा प्रवास लवकर संपतो.

अख्खी बोट हायर करून मिळवा थ्रिलसह दीर्घ सफरिचा आनंद (पंधरा जणांच्या ग्रुपसाठी उपयुक्त) : द डेअर व्हेंचरची अख्खी बोट हायर करून या दीर्घ सफरीचा आनंद लुटता येतो. पंधरा आसनांची बैठक व्यवस्था असणाऱ्या बोटीद्वारे सुरु होणारी हि समुद्री सफर अंदाजे दोन ते अडीच तासांची असते. या सफरीत आपली बोट वरील लघु सफरी प्रमाणेच मार्गक्रमण करते. मात्र सी रॉक परिसरात (भरती ओहोटीचा अंदाज घेऊन) असलेल्या खडकाळ बेटावर आपल्याला लँडिंग करून बोट निघून जाते. बोट तासाभरात परत येई पर्यंत या निर्जन बेटावर वेळ कसा घालवावा हा प्रश्न पर्यटकांना पडत नसावा. खडकाळ भाग उथळ असल्याने पाण्यात आपल्याला खडकांना चिकटून बसलेले विविध आकाराचे रंगबिरंगी शंखशिंपले, समुद्री वनस्पती, उगीचच इकडेतिकडे तुरुतुरु धावपळ करणारे छोटेछोटे खेकडे आणि इतर जलचर बघतांना तासभर कसा निघून जातो ते कळतच नाही.

बोटीतील सेल्फी पॉईंट : बोटीला दिशा देणारा सुकाणू म्हणजेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू. सुकाणूचे व्हील हाताळत बोट चालवत असल्याचा अनुभव आपल्याला या सफारी दरम्यान घेता येतो. बोटीतील कर्मचारीवर्ग या क्षणाचे चित्र आठवण म्हणून आपल्या मोबाईलमध्ये टिपून देतात. या चित्तथरारक सफारीची तेव्हडीच एक आठवण म्हणून पर्यटक समाज माध्यमांवर अपलोड करण्यात धन्यता मानतात.

डॉल्फिन दर्शन : नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान केलेल्या सफरीत जलक्रीडा करणाऱ्या डॉल्फिनचा थवा दिसून येऊ शकतो. डॉल्फिन अगदी जवळून बघण्यासाठी हिवाळ्यात द डेअर व्हेंचरची सी रॉक मरीन सफारीचा अनुभव जरूर घ्यावा.

सुरक्षा व्यवस्था :
संपूर्ण सफारी दरम्यान बोटीत बसल्या पासून ते सफर पूर्ण होईस्तोवर पर्यटकांना लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक आहे. दोन्ही बोट्स महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड द्वारा मान्यता प्राप्त आहेत. त्याचबरोबर सरकार घालून दिलेले सुरक्षेचे नियम पाळूनच मार्गक्रमण करत असतात. समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास किनाऱ्यावर असलेल्या इतर बोटींकडून तात्काळ मदत मिळू शकत असल्याची माहिती पराग पिंपळे दिली आहे. प्रत्येक बोटीत सेल्फ सिक्युरिटी यंत्रणा कार्यान्वित असून फस्टएड बॉक्स, हवा भरलेले ट्यूब्स, अग्निशमन व्यवस्थेसह बोट सफर करण्यास सज्ज असते. प्रत्येक स्टाफने सरकारमान्य असलेले प्रशिक्षण घेतलेले आहे. बोट्स आणि अधिकृत तिकीट धारक पर्यटक या दोघांचा विमा काढलेला असतो.

येथे कसे पोहचायचे : पुण्याहून आल्यास ताम्हिणी घाटातून आणि मुंबई येथून मुंबई गोवा महामार्गाने आल्यास माणगाव येथून दिवेआगर कडे जाणार फाटा फुटतो. पुढे म्हसळा जसवली वरून थेट दिवेआगर येथे पोहचता येते. रेल्वेने आल्यास माणगाव रेल्वे स्टेशन येथे उतरून आपल्याला या ठिकाणी येता येते. येथून भरडखोल हे अंतर अडीच किलोमीटर इतके आहे. (Google map)

Tags: agro tourismbharadkholDiveagargoogle mapkokankokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismParag PimpleRaigadRaigad tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In