Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

बासलापूरच्या जंगलात वन अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून सुंदर तलावाची निर्मिती

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करा...

लत्तलूर ते लातूर पर्यटन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 26, 2021
407 4
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर जिल्ह्यात काय बघायला आहे हो?

Gandhi Tirtha – Jain Hills

लातूर जिल्ह्यात काय बघायला आहे हो? या प्रश्नाचे उत्तर जागतिक पर्यटन दिनापासून आम्ही लातूर जिल्ह्याची ओळख करून देणाऱ्या इतिहासाच्या पानातून करून देत आहोत. फार लांब लचकनसेल थोडक्यात ओळख असेल, आठवड्यातून एकदा क्रमशः दिली जात आहे.

हा पहिला लेख… लातूरची प्राथमिक ओळख करून देणारा…!!

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. त्याचा विस्तार १८° ०५’ उत्तर ते १९° १५’ उत्तर अक्षांश आणि ७६° २५’ पूर्व ते ७७° ३५’ पूर्व रेखांशां दरम्यान आहे. क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व – पश्चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे.

 लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला स्वतःची ऐतिहासिक ओळख आहे. काही ओळखी तर प्रचंड प्राचीन आहेत.

आजच्या घडीला लातूर जिल्ह्यातील तालुका असलेले उदगीर कर्नाटक राज्याच्या हद्दीला लागून असलेलं आपल्या राज्याचे शेवटचे टोक… याच शहरात बहामनी पूर्व एक महत्त्वाचा किल्ला आहे… मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या वेळी निजामाच्या ताब्यात असलेला.. या किल्‍ल्यावर ज्या इब्राहिमखान गारदीची (जगातल्या जहाल सैन्यात गणले गेलेले गारद्यांच्या सैन्याचा सेना नायक) सत्ता होती. तिथूनचं सदाशिव राव भाऊ यांच्या नेतृत्वातील सैन्याने दिल्लीच्या तख्ताला आव्हानाची लढाई सुरु केली… अशा जहाल सैन्यावर हल्ला करून उदगीरचा किल्ला फत्तेह केला… या लढाई मागचा मुख्य बेत हे गारद्याचे सैन्य मिळवणे होते..  त्याप्रमाणे उदगीर करार झाला…  याच सैन्याच्या बळावर दौलताबाद घेतलं..  पुढे पानिपतच्या युद्धात शेवट पर्यंत चिवट लढा याच गारद्याच्या तुकडीने देऊन सदाशिव भाऊ युद्ध भूमीवर धारातीर्थी पडेपर्यंत यांची धड लढत होती.

 निलंगा तालुक्यातील खरोसा येथे ज्या लेणी आहेत. त्याचा इतिहासही प्राचीन आहे.

खरोसा लेण्यांचे तत्कालीन राजकीय स्थान बघितले तर गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर येते… राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेत इथून 170 किलोमीटर आहे… राष्ट्रकूटाचे मूळ गाव लातूर आहे (लत्तलूर) राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा या राजांनी वेरूळची एक नंबरची कैलास लेणीही कोरल्याचा उल्लेख नागपूरच्या म्युझियम मध्ये आहे. (हा संबंध लातूरशी असल्यामुळे उल्लेख त्यावर सविस्तर लिहूच.) त्यामुळे तत्कालीन काळात या लेण्याचे स्थान अनन्यसाधारण असेच असावे… इथल्या मुख्यलेणीत मात्र रामायणातील दृश्य कोरले आहेत… एका ठिकाणी हिरण्यकशिपुचे नरसिंह रूपातील विष्णुने पोट फाडल्याचे शिल्प आहे… वेरूळच्या कैलास लेण्यातील शिल्पाच्या  रिपलिका वाटाव्यात एवढे साम्य यात आहे.. वेरूळच्या तिथे काळा पाषाण असल्यामुळे झिज झाली नाही इथे मात्र कमालीची झिज झाली आहे.

या लेण्याचा उद्देश शिक्षण देणं असावं आणि इथे छोट्या गुंफा आहेत कदाचित त्या विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असाव्यात….कागदोपत्री याचे फारसे काही पुरावे नाहीत पण डॉ.दाऊद दळवी यांच्या लेण्याच्या इतिहासातील पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख आहे. उदगीरचा किल्ला आणि खारोसा लेण्या या दोन स्थानांचे महात्मे तर राष्ट्रीय स्तरावर अभ्यासले गेले आहे. अजून यावर अभ्यास सुरु आहे.

Tags: cmo maharashtraIndia TourismMahaparyatan.commaharashtra DGIPRmaharashtra paryatanmaharashtra tourismplaces to see in maharashtra
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In