झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरघर
साताऱ्याहून अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर धावडशी हे छोटेसे गाव लागते. मुंबई बंगलोर महामार्गावरून साताऱ्याहून पुण्याकडे जातांना वर्ये गावापासून डावीकडे वळून धावडशी या गावी जाता येते. हे गाव झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेरघर असल्याचे मानले जाते.
गावात प्रवेश करून थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला श्री विठोबाचे देऊळ दिसते. येथून डाव्या बाजूस वळून आपल्याला शिवकालीन असलेल्या श्री भार्गवराम मंदिरापर्यंत जाता येते. लांबूनच आपल्याला या मंदिराची शिखरे दिसतात.
मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिण बाजूस तीन काळ्या पाषाणात बांधलेले पाण्याचे कुंड आहेत. आत उतरण्यासाठी पायऱ्या असून या परिसराला चारही बाजूने भक्कम बंदिस्त तटबंदी आहे.
श्री ब्रह्मेन्द्रस्वामी हायस्कूलच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या हाताला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. छोट्या दरवाज्यातून आपण भव्य अशा सभागृहात प्रवेश करतो. पत्रे घातलेल्या बंदिस्त सभागृह दुमजली असून भिंतींवर अनेक देवदेवतांची चित्रे विविध रंगात रंगवलेली दिसतात.
सभागृह, अंतरगृह आणि गाभारा अशी मंदिर रचना आहे. अंतरगृहात मध्यभागी दगडात कोरलेली कासवाची प्रतिमा आणि डाव्या हाताला एका छोट्या कोनाड्यात भगवान परशुरामाचे निस्सीम भक्त म्हणून ओळख असलेल्या ब्रह्मेन्द्र स्वामी यांची मूर्ती आहे. स्वामी अंदाजे तीनशे वर्षांपूर्वी या गावात येऊन स्थायिक झाले. याच काळात त्यांनी इथे परशुराम मंदिर बांधले असल्याची माहिती मिळते.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक देवीची मूर्ती आहे. कदाचित ही रेणुका मातेची मूर्ती असावी. उजव्या बाजूस श्री गणेशाची मूर्ती आहेत.
गर्भगृहात प्रवेश केल्यावर काळ – काम – परशुराम यांच्या पितळी मूर्ती दिसून येतात. या मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती असल्याचे मानले जाते. गाभाऱ्यात भगवान परशुरामांची चार हातांची मूर्ती आहे. परशु, धनुष्य, बाण अशी आयुधे असून डावा हात आशीर्वाद मुद्रेत आहे.
सन १७४५ साली वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले. परंतु त्यांची समाधी गाभाऱ्याच्या मध्यभागी आहे.
अक्षय्य तृतीयेला परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. वर्षभरात इतरही अनेक सण उत्सव येथे साजरे केले जातात.
मंदिराची बाह्य रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या कळसावर अनेक देवदेवतांच्या लहान लहान मूर्ती आहेत.
काळ्या पाषाणात बांधकाम असलेल्या मंदिरावरील मूर्तिकाम अतिशय सुंदर असेच आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या दगडी बांधणीच्या भिंतीवर भगवान विष्णूंचे दशावतार दिसून येतात.
ब्रह्मेन्द्र स्वामी हे छत्रपती शाहू महाराज पाहिले, बाळाजी विश्वनाथ पेशवे, कान्होजी आंग्रे यांचे अध्यात्मिक गुरू असल्याचे मानले जाते. 1758 साली या मंदिराचा जीर्णोद्धार शाहू महाराज यांनी केला असल्याची माहिती मिळते.
धावडशी येथून जवळच असलेला अजिंक्यतारा किल्ला, कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम, मेढा, यवतेश्वर, सज्जनगड, चंदन-वंदन किल्ले, जरंडेश्वर ही ठिकाणेही बघण्यासारखीच आहेत.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
