श्री देव रामेश्वर आणि श्री कालिका देवी मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी.
श्री देव रामेश्वर आणि श्री कालिका देवी मंदिर – हा व्हिडीओ नक्की बघा……
कसे जायचे
रत्नागिरी शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेले काळबादेवी हे निसर्गरम्य गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. रत्नागिरीहून मिऱ्या बंदराच्या पुढे साखरतर रस्त्याने या गावाकडे जाता येते. पूर्वी पुसाळे नावाने ओळखले जाणारे हे गाव इथे असलेल्या कालिका देवी देवस्थानामुळे आता काळबादेवी म्हणून ओळखले जाते. या परिसरातील कालेश्वरी आणि रामेश्वर ही दोन तीर्थक्षेत्र म्हणजे कोंकणातील भाविकांचे श्रद्धास्थान . रत्नागिरीहून आरेवारे कडे जाणाऱ्या मार्गावर खाडीवरील साखरतर पूल ओलांडताना डाव्या हाताला श्री रामेश्वराचे कौलारू छत आणि श्री काळबादेवीचा पांढराशुभ्र उंच कळस आपल्याला लांबूनच दिसतो. समुद्रकाठाने जाणाऱ्या रस्त्याने गावात शिरल्यावर बसथांब्यापासून डावीकडे वळून आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर उजवीकडे उंच पांढरे शिखर असलेले काळबादेवी मंदिर दृष्टीस पडते.
श्री कालिका देवी मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी – श्री देव रामेश्वर मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी
कालेश्वरी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारी उजव्या हाताला असलेल्या एका छोट्या देवळीत श्री कालिकादेवीची प्राचीन मूर्ती दिसून येते. सभागृह आणि कालिका मातेची मूर्ती असलेला गाभारा अशी मंदिराची रचना आहे . कालिका देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून ही देवी गोव्याहून इथे आली असावी, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कालेश्वरी देवीच्या मुख्य मंदिरासमोर दगडी दीपमाळ आणि तुळशीवृंदावन आहे. शारदीय नवरात्री हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असून वर्षभर इतर धार्मिक सण उत्सव इथे भक्तिभावाने पार पाडले जातात .
श्री देव रामेश्वर मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी
कालिका देवीचे देवस्थानासमोरच आसलेल्या एका छोट्याशा प्रवेशद्वारातून रामेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करता येतो . कौलारू छत आणि काळ्या पाषाणात बांधलेल्या रामेश्वर मंदिराची भव्य पुरातन वास्तू आपले लक्ष वेधून घेते. जांभ्या दगडात बांधलेली फरसबंदी, तुळशी वृंदावन आणि दोन भव्य दीपमाळा असलेले रामेश्वराचे मंदिर खाडी किनाऱ्याला अगदी लागूनच आहे . मुख्य मंदिरात भव्य सभागृह आणि श्री देव रामेश्वराची स्वयंभू पिंडी असलेला गाभारा आहे . गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी श्री गणपती आणि एक नंदी आहे. अनेक भाविक इथे दर्शनाला येत असतात .
मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे पाचशे किलो वजनाची भव्य घंटा आणि दीडशे किलो वजनाची सागरगोटी
या मंदिराचे एक वैशिष्ठ्य म्हणजे येथे असलेली पाचशे किलो वजनाची भव्य घंटा. ही घंटा पोर्तुगीज कालीन असून तिच्यावर १७३७ साल ओतीव कामातच कोरलेले आहे. पेशवाईच्या काळात ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेले यांच्या मार्फत ऊंटावरून येथे पाठवली असल्याची माहिती मिळते. श्री देव रामेश्वराच्या मंदिराचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराच्या आवारात असलेली दीडशे किलो वजनाचा सागरगोटीच्या आकाराचा दगड.
मंदिरांचे सण उत्सव
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी रामेश्वर सप्ताहाला सुरुवात होते. नाम स्मरणाचा गजर आणि भजने अखंड सुरू असतात. दुसऱ्या सोमवारी श्री देव रामेश्वर पालखी सोहळ्याने सप्ताहाची समाप्ती होते. त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री यासह वर्षभर येणारे सण – उत्सव समस्त गावकरी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात .
काळबादेवी गावास लाभलेला विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा
निसर्गाचे वरदान लाभलेल्या काळबादेवी येथील समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटांचे नृत्य पाहून मन हरखून जाते. येथे हंगामामध्ये सीगल पक्षी येतात. कौलारू घरे, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा असे अस्सल कोकणचे सुंदर ग्रामीण रूप येथे आपल्याला पाहायला मिळते.
निवास आणि भोजन व्यवस्था
रत्नागिरी हे शहर येथून जवळच ११ किलोमीटरवर असल्याने तेथे हॉटेल्स , रिसॉर्ट्स आणि होम-स्टे मध्ये निवासाची आणि भोजनाची सोय होऊ शकते.
फारच छान माहिती आणि निसर्ग
पर्यटन कारणयांसाठी पर वणी आहे.
👌👌👌🌹🌹🌹
There is noticeably a bundle to know about this. I assume you made certain nice points in features also. Anthia Ezechiel Fransisco