Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री क्षेत्र हरिहरेश्वर, रायगड – दक्षिण काशी

अनलॉक नंतरचे पर्यटन - Tourism after Unlock

श्री देव विरेश्वर मंदिर, महाड

श्री क्षेत्र हरिहरेश्वर, रायगड – दक्षिण काशी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 9, 2021
624 7
0
867
SHARES
3.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी, अरबी समुद्राला जेथे मिळते त्या संगमाच्या मुखावर हरिहरेश्वर नावाचे छोटेसे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला आकर्षित करणारा अथांग समुद्रकिनारा. नारळी पोफळीच्या बागांच्या गर्दीत आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तिर्थस्थान आहे. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे क्षेत्र भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. या देवस्थानाच्या बांधकामाचा निश्चित कालखंड ज्ञात नाही. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे मिळतात. हरिहरेश्वर म्हणजे हरी आणि ईश्वर. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती अशी चार स्थानं लिंग रूपात हरिहरेश्वराच्या गाभाऱ्यात स्थित आहेत. सभामंडपात एका कोपऱ्यात श्री गणपती आणि गरुडाच्या मूर्ती असून गाभाऱ्यासमोर काळ्या पाषाणातील नंदी आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या अगदी समोरच लोकदैवत आणि भगवान शंकराचे अंश रूप श्री काळभैरव मंदिर आहे. या देवळात काळभैरावाबरोबर श्री योगेश्वरीची मूर्ती स्थित आहे. कालभैरव हा दैत्यांचे निर्दालन आणि पिशाच्च्यांना मुक्ती देतो आणि आपल्या कृपेमुळे मानवास व्याधीमुक्त करून सर्व दृष्टीने सुखी करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री क्षेत्र हरिहरेश्वर, रायगड

कालभैरव हे या क्षेत्राचे रक्षक स्थान असल्याने आणि शंकरांचे वरदान लाभल्याने पाहिलं दर्शन श्री काळभैरवाचे नंतर हरिहरेश्वराचे आणि परत काळभैरवाचे दर्शन घावे अशी या क्षेत्री दर्शनाची पद्धत आहे . या ठिकाणी हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार मंदिर आहेत. मंदिर परिसरात तीन पुरातन दगडी दीपमाळा दिसून येतात. येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती कौलारू छप्पर आहेत. जड रूपात देव असल्याची माहिती पुराणात आहे. अगस्ती ऋषींनि केलेल्या तपश्चर्येवरुन हरिहरेश्वर लिंग रूपात प्रगटले. एकमुखी दत्ताच्या स्वरूपात हरिहरेश्वराने अगस्ती मुनींना दर्शन दिल्यानंतर ते लिंग स्वरूपात इथेच स्थित झाले. त्यानंतर अगस्ती मुनी दक्षिणापथाला गेले अशी आख्यायिका सांगितली जाते.

श्री हरिहरेश्वर – ब्रम्हा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वती अशी चार स्थानं लिंग रूपात गाभाऱ्यात स्थित

हरिहरक्षेत्र (अपरान्त भूमी) –
हरिहर क्षेत्राचे स्कंद पुराणात वर्णन आहे. त्यानुसार १०८ योजन लांब आणि ६४ योजन रुंद अशी अपरान्ताची भूमी या हरिहर क्षेत्रात येते. महाबळेश्वर आणि गोकर्ण महाबळेश्वर अशा दोन सीमा असल्याचे सांगितले जाते. हरिहरेश्वर हा हरिहरेश्वर क्षेत्राचा मध्यबिंदू म्हणून ओळखले जाते . या क्षेत्रामध्ये बारा स्वयंभू शिव स्थाने आहेत . कर्नाटकातील गोकर्ण येथील मुरुडेश्वर, गोव्याचे सप्तकोटेश्वर, देवगड येथी कुणकेश्वर, दापोली तालुक्यातील आसूद येथी व्याघ्रेश्वर, कोळथरे येथील कोळेश्वर, श्रीवर्धन येथी जीवनेश्वर, अमृतेश्वर, वसई जवळील निर्मलक्षेत्र, तुंगारेश्वर, वैतरणी नदीपर्यंतची सीमा या हरिहर क्षेत्राची भूमी म्हणून मानली जाते.

डोंगर परिक्रमा मार्ग

डोंगर परिक्रमा –
श्री हरिहरेश्वर आणि काळभैरव योगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर या डोंगराची परिक्रमा भाविक आवडीने करतात. प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावर डोंगरावरून अंदाजे दीडशे पायऱ्या उतरून खाली समुद्रातून हि परिक्रमा केली जाते. समुद्रास ओहोटी असल्यास या मार्गावरून जात येते. भरती असल्यास समुद्राचे पाणी या मार्गावर येत असल्याने पादक्रमण करणे अशक्यच असल्याने स्थानिकांकडून माहिती घेऊनच परिक्रमा करावी. समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अश्या अनेक पवित्र ठिकाणांचे भाविक दर्शन घेतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
प्रथेप्रमाणे येथील विष्णुपदावर श्राद्ध करून पितरांना मुक्ती मिळावी म्हणून पिंडदान केले जाते

श्री कालभैरव आणि श्री योगेश्वरी देवी मंदिर

कुलदैवत हरिहरेश्वर –
श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान श्रीमंत पेशव्यांचे (भट घराणे) कुलदैवत आहे. हरिहरेश्वर हे चित्तपावन ब्राह्मणांच्या दाबके, काळे, करमरकर, गोगटे, भानू, वर्तक, कर्वे, कुडाळकर, केतकर, गांगल, घाणेकर, जोशी, टोळे, थोरात, देशमुख, धामणकर, पंडित, पिटकर, पोतदार, पेशवा, बेडेकर, भट , महाजन, मरुकर, माटे, मायदेव, राजमाचीकर, वझे, आचवल, गांधारे, घैसास, चिळकर, टेणे, नेकणे, गांगलेकर, गारगेकर, गोवित्रीकर, गोरे, घाटे, भैरव, ताम्हनकर, पळणिटकर या घराण्यांचे कुलदैवत असल्याचे मानले जाते.

हरिहरेश्वर समुद्र किनारा

हरिहरेश्वर गाव –
काशी क्षेत्रासदृश्य माहात्म्य असल्याने हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर गावाचा आकार सुपा सारखा आहे. मावळतीकडे जर सूप नेऊन ठेवलं तर जसा आकार पाहायला मिळेल तसा गावाचा आकार आहे. महसूल खात्यात या गावाचे नाव देवघर असं आहे. देवाचं घर म्हणून देवघर असं नाव पूर्वी प्रचलित होते. इथे स्थित असलेल्या देवाच्या नावाने हरिहरेश्वर असं गावाचं नाव सध्या रूढ झालेले आहे. ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आणि समोरच असलेल्या समुद्रकिनारी वसलेले हरिहरेश्वर हे गाव. देवळाच्या मागे असलेले पर्वत ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे चार जड रूपाने असल्याने, या क्षेत्रात चार टेकड्यासारखीच रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. जशी गाभार्यात लिंगाची स्थाने आहेत तसेच स्थान माहात्म्य या पर्वतांचे आहे. कुठल्याही दिशेने बघितलत तर या पर्वताचा आकार शिवपिंडी सारखा दिसतो. भौगोलिक वैशिष्ट्य असलेला असा डोंगर संपूर्ण कोकण किनारपट्टीत बघायला मिळत नाही.

येथे कसे जातायेईल –
हे क्षेत्र मुंबईपासून १९२ किलोमीटर तर पुण्यापासून अंदाजे १७५ किमी दूर आहे. हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील दासगावपासून फाटा फुटतो, तर श्रीवर्धनचा रस्ता माणगाव येथून सुरू होतो. श्रीवर्धनवरून होडीने हि हरिहरेश्वरला जाता येते. कोकण रेल्वेच्या माणगाव स्थानकावर उतरून हरिहरेश्वरला जाता येते. एस टी बस किंवा खासगी वाहनांनी या ठिकाणी आपण येऊ शकतो.

श्री देव वालुकेश्वर मंदिर, असगोली, गुहागर

निवास भोजन व्यवस्था –
हरिहरेश्वरमध्ये राहण्या जेवण्याची उत्तम सोय आहे. येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह असल्याने पर्यटकांना सर्व सोयी मिळू शकतात. खासगी हॉटेलही बरीच आहेत. शिवाय घरगुती रहाण्याची अगदी स्वस्तात सोयही येथे होते. कोकणी पाहुणचार अनुभवायचा असेल तर या क्षेत्राला नक्की भेट द्या.

श्री परशुराम मंदिर, चिपळूण

पूजा/अभिषेक आणि देणगीसाठी संपर्क –
या क्षेत्राला पूर्वापार श्रीमंत पेशवे सरकारकडून दरसाल ११५२ रुपये नेमणूक मिळत होती. १९८१ सालापासून महाराष्ट्र शासनातर्फे ३००० रुपये नेमणूक म्हणून आणि रायगड जिल्हा परिषदेतर्फे सनई चौघड्यासाठी १०००० रुपये मिळतात अशी माहिती देणारा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईने देवस्थानचे खर्चात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खर्चाचा कमी करण्यासाठी अनेक भाविक देणग्या देऊन हातभार लावतात. जुन्या मंदिराची दुरुस्ती आणि भाविकांच्या सोयी करण्यासाठी हा निधी फारच कमी पडत असल्याने यात्रेकरूंना सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती श्री हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान तर्फे करण्यात येत आहे . ज्या भाविकांना पूजा अभिषेक करायचा असले त्यांनी मंदिर संस्थांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे.

श्री क्षेत्र मार्लेश्वर – नाग सर्पांच्या सानिध्यात असलेले जगातील एकमेव शिवलिंग

Tags: kokan agro tourismkokan paryatankokan tourismkuldaivatkuldaivat darshanmahaparyatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentpeshwaplaces to see in kokanRaigad tourismshrimant bajirao peshvatourist places in raigad
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In