Tuesday, September 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
इटली येथील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास महामंडळाचा पुढाकार

पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत

जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इटली येथील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास महामंडळाचा पुढाकार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 26, 2023
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी

मुंबई l महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इटलीमधील मिलान येथे 124 व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलला चांगली मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठया प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे.

या प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला असून या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी कोल्हापुरी चप्पलची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी विपणन व प्रसार करावे, असे सांगितले. प्रदर्शनातील चर्मवस्तू व पादत्राणांच्या विविध स्टॉलला भेट देऊन, अशाच प्रकारचे उत्पादने महामंडळाच्या उत्पादन केंद्रात तयार करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

Tags: Kolhapur chappalsKolhapur TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In