
अगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार… श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई
नवी मुंबई l स्थानिक समुदायांमध्ये पर्यटनाचे महत्त्व आणि त्याचे सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक मूल्य याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) प्रत्येक वर्षी एक घोषवाक्य (थीम) जाहीर केली जाते. यावर्षीची घोषवाक्य “Tourism and Green Investment”-पर्यटन आणि हरित गुंतवणूक” ही थीम जाहीर केलेली असून लोकांसाठी पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी जास्तीत जास्त चांगली गुंतवणुकीची गरज अधोरेखित करते. त्या अनुषंगाने, पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि भारत सरकार पर्यटन विभागात त्यांच्या संयुक्त विद्यामाने खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
१) सिंधुदुर्ग किल्ला: पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई आणि भारत सरकार पर्यटन विभाग तसेच विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल पर्यटन क्लब, कसाल जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला येथे स्वच्छता मोहीम, सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरूकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे यामध्ये ६० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
२) एलिफंटा लेणी: पर्यटन संचालनालय कोकण विभाग भारत सरकार पर्यटन विभाग आणि नायर हॉस्पिटल टुरिझम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एलिफंटा लेणी येथे स्वच्छता मोहीम सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरूकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये ८० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: पर्यटन संचालनालय कोकण विभाग, भारत सरकार पर्यटन विभाग आणि केंद्रीय विद्यालय पर्यटन क्लब कुलाबा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वच्छता मोहीम सामूहिक प्रतिज्ञा आणि जागरूकता कार्यक्रम दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये 80 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
४) पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी कमरे व्हॅली रिसॉर्ट नवली कमारे जिल्हा पालघर येथे सकाळी ११.०० वाजता पर्यटन उद्योजकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
५) पर्यटन संचालक कोकण विभाग आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरूळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅव्हल फोटोग्राफी कॉम्पिटिशन,75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या परिसरात 75 झाडे लावण्यात येणार आहेत.
ट्रॅव्हल फोटोग्राफी कॉम्पिटिशन स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन संचालना यामार्फत मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.अशा अगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी दिली.