Sunday, November 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार कृषीमंत्री अब्दुल सत्तार

ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार पर्यटन मंत्री

जैन इरिगेशनच्या केळी संशोधन व विकास कार्याला 'बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड'

कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 22, 2022
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी शास्त्रज्ञ निवास व वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाचे कृषीमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर l शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन कार्य करीत आहे. उत्पादन  खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर स्थित कृषी महाविद्यालयाच्या (बजाजनगर) कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, केशव तायडे आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन चांगले निर्णय घेत आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. शेतकऱ्यांना उत्तम वाण व आधुनिक यंत्रसामग्री मिळावी यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनकार्य सुरु आहे. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही उत्तम कामगिरी करीत १७६ वाण आणि ४३ शेतकी यंत्र विकसीत केली आहेत. संशोधनाचे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासनाकडून कृषी विद्यापीठांना सर्वतोपरीत सहाय्य करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत विद्यापीठाच्या नागपूर येथील ११६ वर्ष जुन्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता येथे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना राहण्याची उत्तम सोय होईल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी  राज्य शासनाकडून आवश्यक मदत करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. सत्तार यांनी दिले.

सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन

सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’म्हणून देशभर साजरे केले आहे. त्यानिमित्त सिल्लोड जि. औरंगाबाद येथे येत्या १ ते ५ जानेवारी  दरम्यान ‘कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठ आणि महाबीजचे एकूण ६०० स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. तसेच, कृषी संबंधीत विविध कंपन्याही सहभागी होणार आहेत. कमी उत्पादन खर्चात किफायतशीर शेती करण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध असेल. या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सत्तार यांनी केले.

कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अशी आहे वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची वास्तू – येथील बजाजनगर भागात एकूण ८७७ चौ.मिटर परिसरात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची इमारत आहे. यात ४ व्हीआयपी तर अन्य ८ असे एकूण १२ कक्ष आहेत. दोन वर्षांत ही इमारत पूर्णत्वास आली असून यासाठी राज्यशासनाकडून २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत प्रदर्शन**अशोक जैन, अनिल जैन यांच्या… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत दाखल मुंबई | महाराष्ट्र पर्यटन… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले गेले, याचा उल्लेख सापडत नाही,… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismForestIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNagpurNagpur tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In