
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना …. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई l किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्रीय पुरातत्व विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने येथील सुरक्षा चौकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
या संदर्भात मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते. या बैठकीस सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रांताधिकारी राहुल मुंडके, उपअधीक्षक जगदीश काकडे, ट्रेकर आणि दुर्गप्रेमीचे राजेंद्र फडके, रायगड विकास प्राधिकरणाचे सदस्य रघुजी राजे आंग्रे, केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे राजन दिवेकर व फाल्गुनी काटकर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, रायगड किल्ला परिसरात अस्वच्छतेबाबत तसेच सुरक्षा चौकीबाबत दुर्गप्रेमी आणि इतिहास संशोधकांकडून तक्रारी येत आहेत. हा परिसर आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याच्या जतन व संवर्धनामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
रायगड किल्ल्यावर परिसर स्वच्छता राखणे, या परिसरात उभारण्यात आलेल्या सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत स्थानिक प्रशासनाने तात्काळ बैठक आयोजित करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातगांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
- (no title)प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
