
जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव l येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने “हाऊ गांधी कम्स अलाइव्ह” अंतर्गत संगीत विषयावर रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते १२.३० या वेळात पुणे येथील दक्षिणा द्वारका फाऊंडेशनच्या संचालिका सुश्रूती संथानम यांचे “संगीत , सभ्यता व भारतीय समाज” विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भोजनोत्तर सत्रात मंदार कारंजकर यांचे “शरीर, मन व विचारांवर होणारा संगीताचा प्रभाव” तर दाक्षायणी आठल्ये “हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्यापूरक मूल्यांची समीक्षा” या विषयावर प्रस्तुती करणार आहेत. सर्व मित्रांना उपस्थिती देणाऱ्या संगीत साधकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा व त्यासाठी गिरीश कुलकर्णी (नंबर ९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संस्थांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन



