Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
समुद्रकिनारी निसर्गरम्य ठिकाणी देव दर्शनाला जायलाच हवे असे श्री कालिकादेवी आणि भगवान श्री शंकराचे देवस्थान

लोकमान्य टिळकांचे मूळ गाव तेथील त्यांचे घर, वाडी, मंदिर पाहून तुम्हाला त्यांच्या काळात गेल्याचा येईल अनुभव....

काजू प्रक्रिया उद्योग

समुद्रकिनारी निसर्गरम्य ठिकाणी देव दर्शनाला जायलाच हवे असे श्री कालिकादेवी आणि भगवान श्री शंकराचे देवस्थान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 27, 2020
525 5
2
729
SHARES
3.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री देव रामेश्वर आणि श्री कालिका देवी मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी. 

श्री देव रामेश्वर आणि श्री कालिका देवी मंदिर

श्री देव रामेश्वर आणि श्री कालिका देवी मंदिर – हा व्हिडीओ नक्की बघा……

कसे जायचे

रत्नागिरी शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेले काळबादेवी हे निसर्गरम्य गाव समुद्रकिनारी वसलेले आहे. रत्नागिरीहून मिऱ्या बंदराच्या पुढे साखरतर रस्त्याने या गावाकडे जाता येते. पूर्वी पुसाळे नावाने ओळखले जाणारे हे गाव इथे असलेल्या कालिका देवी देवस्थानामुळे आता काळबादेवी म्हणून ओळखले जाते. या परिसरातील कालेश्वरी आणि रामेश्वर ही दोन तीर्थक्षेत्र म्हणजे कोंकणातील भाविकांचे श्रद्धास्थान . रत्नागिरीहून आरेवारे कडे जाणाऱ्या मार्गावर खाडीवरील साखरतर पूल ओलांडताना डाव्या हाताला श्री रामेश्वराचे कौलारू छत आणि श्री काळबादेवीचा पांढराशुभ्र उंच कळस आपल्याला लांबूनच दिसतो. समुद्रकाठाने जाणाऱ्या रस्त्याने गावात शिरल्यावर बसथांब्यापासून डावीकडे वळून आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर उजवीकडे उंच पांढरे शिखर असलेले काळबादेवी मंदिर दृष्टीस पडते.

श्री कालिका देवी मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी – श्री देव रामेश्वर मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी

कालेश्वरी देवीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारी उजव्या हाताला असलेल्या एका छोट्या देवळीत श्री कालिकादेवीची प्राचीन मूर्ती दिसून येते. सभागृह आणि कालिका मातेची मूर्ती असलेला गाभारा अशी मंदिराची रचना आहे . कालिका देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून ही देवी गोव्याहून इथे आली असावी, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कालेश्वरी देवीच्या मुख्य मंदिरासमोर दगडी दीपमाळ आणि तुळशीवृंदावन आहे. शारदीय नवरात्री हा या मंदिराचा प्रमुख उत्सव असून वर्षभर इतर धार्मिक सण उत्सव इथे भक्तिभावाने पार पाडले जातात .
श्री कालिका देवी मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी

श्री देव रामेश्वर मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी

कालिका देवीचे देवस्थानासमोरच आसलेल्या एका छोट्याशा प्रवेशद्वारातून रामेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करता येतो . कौलारू छत आणि काळ्या पाषाणात बांधलेल्या रामेश्वर मंदिराची भव्य पुरातन वास्तू आपले लक्ष वेधून घेते. जांभ्या दगडात बांधलेली  फरसबंदी, तुळशी वृंदावन आणि दोन भव्य दीपमाळा असलेले रामेश्वराचे मंदिर खाडी किनाऱ्याला अगदी लागूनच आहे .  मुख्य मंदिरात भव्य सभागृह आणि श्री देव रामेश्वराची स्वयंभू पिंडी असलेला गाभारा आहे . गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी श्री गणपती आणि एक नंदी आहे.   अनेक भाविक इथे दर्शनाला येत असतात .
श्री देव रामेश्वर मंदिर, काळबादेवी, रत्नागिरी

मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे पाचशे किलो वजनाची भव्य घंटा आणि दीडशे किलो वजनाची सागरगोटी

या मंदिराचे एक वैशिष्ठ्य म्हणजे येथे असलेली पाचशे किलो वजनाची भव्य घंटा. ही घंटा पोर्तुगीज कालीन असून तिच्यावर १७३७ साल ओतीव कामातच कोरलेले आहे. पेशवाईच्या काळात ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेले यांच्या मार्फत ऊंटावरून येथे पाठवली असल्याची माहिती मिळते. श्री देव रामेश्वराच्या मंदिराचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराच्या आवारात असलेली दीडशे किलो वजनाचा सागरगोटीच्या आकाराचा दगड. 
दीडशे किलो वजनाचा सागरगोटीच्या आकाराचा दगड

मंदिरांचे सण उत्सव

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी रामेश्वर सप्ताहाला सुरुवात होते. नाम स्मरणाचा गजर आणि भजने अखंड सुरू असतात. दुसऱ्या सोमवारी श्री देव रामेश्वर पालखी सोहळ्याने सप्ताहाची समाप्ती होते. त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री यासह वर्षभर येणारे सण – उत्सव समस्त गावकरी एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात .
पाचशे किलो वजनाची भव्य घंटा

काळबादेवी गावास लाभलेला विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा

निसर्गाचे वरदान लाभलेल्या काळबादेवी येथील समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटांचे नृत्य पाहून मन हरखून जाते.  येथे हंगामामध्ये सीगल पक्षी येतात. कौलारू घरे, नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा असे अस्सल कोकणचे सुंदर ग्रामीण रूप येथे आपल्याला पाहायला मिळते.

निवास आणि भोजन व्यवस्था



रत्नागिरी हे शहर येथून जवळच ११ किलोमीटरवर असल्याने तेथे हॉटेल्स , रिसॉर्ट्स आणि होम-स्टे मध्ये निवासाची आणि भोजनाची सोय होऊ शकते.

MahaParyatan.com

Tags: Kalbadevi & Rameshwar Mahadev
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Comments 2

  1. सुनील केळकर says:
    6 years ago

    फारच छान माहिती आणि निसर्ग
    पर्यटन कारणयांसाठी पर वणी आहे.
    👌👌👌🌹🌹🌹

    Reply
  2. yify says:
    6 years ago

    There is noticeably a bundle to know about this. I assume you made certain nice points in features also. Anthia Ezechiel Fransisco

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In