Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जव्हार – मस्त पावसाळी डेस्टिनेशन

पावसाळी डेस्टिनेशन - टकमक किल्ला

मेहरूण तलाव परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ

जव्हार – मस्त पावसाळी डेस्टिनेशन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
418 4
0
580
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धबधबा, अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला हौशी पर्यटकांनी जरुर भेट द्यायलाच हवी असे ठिकाण

सध्या सर्वदूर पाऊस कोसळतोय. या पावसात भिजायची मजा काही औरच असते. मनसोक्त भिजायला भटक्या मंडळींची पावलं अनेक स्पॉटसकडे वळत असतात. ठाणे जिल्ह्यातलं जव्हार हे असंच एक मस्त ठिकाण. तुफान कोसळणारा धबधबा, अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला इथे जरुर भेट द्यायला हवी.

जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग. पण, पावसाळ्याच्या दिवसांत इयलं वातावरण मनाला अक्षरशः वेड लावतं. दाट धुकं, थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस असं धुंद वातावरण वातावरण इथे पावसाळ्याच्या दिवसांत अनुभवायला मिळतं.

जव्हारला ‘महाराष्ट्रातलं चेरापुंजी’ अशी उपमा दिल्यास वावग ठरणार नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याचं बरदान जव्हारला लाभलं आहे. खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वहात असतात.

जव्हारचा हनुमान पॉइण्ट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्गसौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा व्ह्यू पॉइण्ट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉइण्ट प्रसिद्ध आहे. जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला प्रचंड असा दाभोसा धबधवा. तुफान वेगाने कोसळणारी पाणी पाढून अंग शहारतं. जवळपासच्या २०० चौरसकिलोमीटर्सच्या परिसरात इतका मोठा धबधबा दिसणार नाही असं इथली स्थानिक मंडळी छातीठोकपणे सांगतात. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडत असतात. त्यात भिजणं म्हणजे पर्वणीच… या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे.

अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळयातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करुन देतं. जोरदार पावसाने हे धरण भरुन वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिये खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे ६ ते ७ किलोमीटर्सवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे. चिंब भिजून कडकडून भूक लागली की इथली गरमागरम नागलीची भाकरी आणि त्यासोबत उडदाचं भुजा खाण्यातला आनंद म्हणजे केवळ अवर्णनीय. कसं जाल ?

मुंबई- अहमदाबाद हायवेवरुन निघाल्यास मनोरच्या मस्तान नाक्याजवळून जव्हारला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने विक्रमगड़ आणि तिथून जव्हारला पोहोचता येतं. याशिवाय भिवंडीहून वाडा – विक्रमगड करून जव्हारला पोहोचता येतं. रेल्वेने जायचं असल्यास पश्चिम रेल्वेच्या पालघर आणि इहाणू रेल्वेस्टेशनहून जव्हारला जाणान्या बस सुटतात. शिवाय ठाणे कल्याणहून देखील जव्हारला जाणाऱ्या बस आहेत. जव्हारमध्ये राहण्यासाठी काही हॉटेल्सची व्यवस्था आहे. साभार – पर्यटन महाराष्ट्राचे १

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Agastya Sea View Apartments, Dapoli
Tags: agro tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismThaneजव्हार
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In