
सुविधा वाढल्यास पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती शक्य
l Mahaparyatan l मुंबई l अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीत वने राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, उपसचिव वने बा.ना.पिंगळे, नागपूरचे उपवनसंरक्षक बाला यावेळी बैठकीला उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले,अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंभोरा सिंचन प्रकल्प (नल-दमयंती सरोवर) हा प्रकल्प प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणी पर्यटन सुविधा वाढल्यास स्थानिक ठिकाणी पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होईल तसेच शेकदरी सिंचन प्रकल्प येथेही पर्यटन वाढीस चालना देण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. वन विभागाने यादृष्टीने कार्यवाही करावी. सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प या दोन्ही भागात निसर्ग वन पर्यटन विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी बैठकीत दिल्या.
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
- (no title)
आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा व शेकदरी सिंचन प्रकल्प येथील निसर्ग वन पर्यटन विकसित करण्याबाबत सविस्तर मुद्दे बैठकीत मांडले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
