Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, भराडे , ता.  राजापूर  जि.  रत्नगिरी

अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा, शेकदरी निसर्ग वन पर्यटन केंद्र विकसित करावे... राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

अमरावतीच्या पर्यटनाला वडाळी तलावाच्या विकासामुळे चालना मिळेल... महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, भराडे , ता. राजापूर जि. रत्नगिरी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 24, 2022
556 5
0
772
SHARES
3.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

विष्णुवृद्ध गोत्राच्या परांजपे, देव, मंडलिक घराण्यांचे कुलदैवत

परांजपे, देव, मंडलिक घराण्यांचे कुलदैवताचा हा व्हिडिओ

श्री देव लक्ष्मीनारायणाचे मंदिर – श्री देव लक्ष्मीनारायणाचे मंदिर हे राजापूर तालुक्यातील (जिल्हा रत्नागिरी) वाडा भराडे व मोगरे गावांच्या वेशीवर आहे. रत्नागिरी – आडिवरे – राजापूर रस्त्यावर आडिवरे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भराडे – मोगरे या गावांकडे जाणारा फाटा आहे. फाट्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याला लागूनच उजव्या बाजूस श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन असे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे तीर्थक्षेत्र आहे. एकांतात असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला दोन किलोमीटर पर्यंत वस्ती देखील नाही. पुरातन, जागृत अशा या देवस्थानाची पेशव्यांच्या दप्तरी नोंद सापडते. सवाई माधवरावांच्या जन्मदिनानिमित्त पेशव्यांनी काही देणगी या देवस्थानाला दिली असल्याची माहिती सांगितली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार शके १७०५ म्हणजे सन १७८७ झाल्याची नोंद सापडते. परांजपे यांची वस्ती फार प्राचीन काळी गावखडी या गावात होती. तेथून ही मंडळी कोंडसर या गावी आली. त्यानंतर मोगरे येथे परांजपे मंडळी स्थायिक झाली. शके १५३३ म्हणजेच सन १६११ मध्ये या मंदिराची निर्मिती झाल्यापासून परांजपे घराणी या लक्ष्मीनारायणाला आपला कुलस्वामी मानू लागली असल्याची माहिती मिळते.

कोंकणातील परशुरामाचे पुरातन मंदिर – व्हिडिओ

येथे कसे जायचे – श्री देव लक्ष्मीनारायणाचे मंदिर हे राजापूर तालुक्यातील (जिल्हा रत्नागिरी) वाडा भराडे व मोगरे गावांच्या वेशीवर आहे. रत्नागिरी – आडिवरे – राजापूर रस्त्यावर आडिवरे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भराडे – मोगरे या गावांकडे जाणारा फाटा आहे. फाट्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याला लागूनच उजव्या बाजूस श्री लक्ष्मीनारायणाचे पुरातन असे मंदिर आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे तीर्थक्षेत्र आहे. एकांतात असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला दोन किलोमीटर पर्यंत वस्ती देखील नाही. पुरातन, जागृत अशा या देवस्थानाची पेशव्यांच्या दप्तरी नोंद सापडते. सवाई माधवरावांच्या जन्मदिनानिमित्त पेशव्यांनी काही देणगी या देवस्थानाला दिली असल्याची माहिती सांगितली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार शके १७०५ म्हणजे सन १७८७ झाल्याची नोंद सापडते. परांजपे यांची वस्ती फार प्राचीन काळी गावखडी या गावात होती. तेथून ही मंडळी कोंडसर या गावी आली. त्यानंतर मोगरे येथे परांजपे मंडळी स्थायिक झाली. शके १५३३ म्हणजेच सन १६११ मध्ये या मंदिराची निर्मिती झाल्यापासून परांजपे घराणी या लक्ष्मीनारायणाला आपला कुलस्वामी मानू लागली असल्याची माहिती मिळते.

कुलदैवत
जीर्णोधारापूर्वीचे श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर

जीर्णोधारापूर्वीच्या देवस्थानाची माहिती – चारही बाजूनी जांभ्या दगडाची भक्कम तटबंदी असलेल्या मंदिर परिसराचे आवार खूप मोठे आहे. मंदिराच्या अगदी समोरच २५-३० फूट उंचीची पुरातन अशी दगडी दीपमाळ आहे. त्याच्या शेजारी मोठे तुळशीवृंदावन आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून एक मोठा उघडा सभामंडप, त्याच्यापुढे छोटा बंदिस्त सभामंडप आणि आत श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती असलेला गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिराची बांधणी ही लाकडी खांबांवर आधारित असून संपूर्ण मंदिरावर कौलारू छप्पर आहे.

चारही बाजूनी जांभ्या दगडाची भक्कम तटबंदी असलेल्या मंदिर परिसराचे आवार खूप मोठे आहे. मंदिराच्या अगदी समोरच २५-३० फूट उंचीची पुरातन अशी दगडी दीपमाळ आहे. त्याच्या शेजारी मोठे तुळशीवृंदावन आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून एक मोठा उघडा सभामंडप, त्याच्यापुढे छोटा बंदिस्त सभामंडप आणि आत श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती असलेला गाभारा अशी मंदिराची रचना आहे. मंदिराची बांधणी ही लाकडी खांबांवर आधारित असून संपूर्ण मंदिरावर कौलारू छप्पर आहे.

कुलदैवत l दक्षिण काशी l
लक्ष्मीनारायणाची मूर्ती

लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि गाभारा – गाभाऱ्यात एका दगडी चौथऱ्यावर शाळीग्राम शिळेमध्ये घडविलेली श्री देव लक्ष्मीनारायणाची मूर्ती सुमारे दोन फूट उंचीची आहे. श्री नारायण हे गरुडाचे मस्तकावर डावी मांडी मुडपून बसलेले आहेत. त्यांचे डावे मांडीवर श्री लक्ष्मी उजवी मांडी मोडून बसलेली आहे. मूर्तीच्या खालच्या दोनही बाजूस द्वारपाल आहेत. ही मूर्ती चार हातांची असून वरच्या उजव्या हातात चक्र, खालच्या उजव्या हातात शंख, वरचे डावे हातात गदा, तर खालचे डाव्या हातात पद्म आहे. मूर्तीच्या मागे पितळी प्रभावळ असून मस्तकावर पंचमुखी नागाचा फणा आहे. मंदिर ट्रस्टने नित्यपूजा करण्यासाठी पुजाऱ्याची नेमणूक केलेली आहे. श्री. चारुहास पाध्ये हे नित्यपूजा करतात. ज्या भाविकांना पूजा, अभिषेक, महानैवैद्य किंवा अन्य धार्मिक विधी करावयाचे असतील त्यांनी मनिऑर्डर पाठवल्यास धार्मिक विधी संपन्न करून प्रसाद व अंगारा पाठविला जातो. श्री. चारुहास पाध्ये, पुजारी – श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भराडे यांच्याशी (02353) 226413 या दूरध्वनीवर संपर्क साधल्यास वरील धार्मिक विधी संपन्न केले जाऊ शकतात.

शांडिल्यगोत्री जोशी यांचे कुलदैवत – श्री लक्ष्मीनृसिंह

वार्षिक सण उत्सव – श्रावण महिन्यात कृष्ण जन्माचा म्हणजेच गोकुळाष्टमीचा सोहळा मोठ्याप्रमाणात इथे साजरा केला जातो. बाहेरगावाहून अनेक कुलबांधव या कार्यक्रमासाठी येतात. रात्री कृष्णजन्माचा सोहळा आणि दुसऱ्या दिवशी दहीकाला असा कार्यक्रम असतो. अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी ते त्रिपुरी पौर्णिमा असा संपूर्ण महिना रोज पहाटे काकड आरती आणि हरि जागर होतो. भराडे ग्रामस्थांच्यावतीने दत्त जयंतीच्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि महाप्रसाद असा मोठा कार्यक्रम दरवर्षी असतो. समस्त गावकरी आणि मंदिराच्या ट्रस्टचे सभासद, कुलबांधव या सण उत्सवांमध्ये सहभागी होतात.

भक्तनिवास

भक्तनिवास – दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या कुलबांधवांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था मंदिर परिसरातच व्हावी या दृष्टीने श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट आणि परांजपे विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिराला लागूनच श्री निवास ही इमारत बांधली आहे. या भक्तनिवासाच्या देखभालीसाठी श्री. ठाकूरदेसाई यांची पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यकाळात सर्व सोयींनीयुक्त असे मोठे भक्तनिवास बांधण्याचा दोन्हीही ट्रस्टचा मानस आहे. भक्तनिवासामध्ये निवासासाठी एका खोलीसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते, ज्यामध्ये ४ व्यक्ती राहू शकतात. भराडे येथे भक्त निवासामध्ये राहण्याची तसेच योग्य दरात न्याहारी आणि जेवणाची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी पूर्वसूचना दिलेली उत्तम. ही निवासाची सोय फक्त परांजपे, मंडलिक, देव यांच्यासाठीच उपलब्ध आहे. भक्तनिवास माहितीसाठी श्री. ठाकूरदेसाई, व्यवस्थापक भक्त निवास, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भराडे यांच्याशी (02353) 226477 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

कुलदैवत
नवीन मंदिर

जीर्णोद्धारानंतरचे मंदिराची रचना – २०११ साली मंदिराला ४०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करावयाचा संकल्प करण्यात आला. सदरचे काम दोन टप्प्यांमध्ये करावयाचे असे ठरले. त्यानुसार २०१४ साली गाभाऱ्याचे संपूर्ण नूतनीकरण केले गेले, तर २०१६ साली सभामंडपाचे नूतनीकरण करण्यात आले. हे मंदिर पूर्वाभिमुख असून आवारातून बाहेर पडण्याच्या पूर्वद्वारावर बंगला आहे. येथेच शेजारी शके १८२० (सन १८९८) चे सुमारास वेदशाळा होती. महाद्वाराचे बाहेर एक मोठी जुनी व बांधीव विहिर आहे. मंदिराचे तीन विभाग आहेत. श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती असलेला मूळ गाभारा. त्याला लागून असलेला छोटासा विभाग, ज्यामध्ये डावीकडे श्री गणपती व उजवीकडे श्री दत्ताच्या सुंदर मूर्ती आहेत आणि पुढील प्रशस्त दुमजली सभामंडप. या सभामंडपामध्ये उत्सवप्रसंगी कीर्तने होतात.

बहुतांश चित्पावन कुळांचे कुलदैवत असलेल्या श्री व्याडेश्वराचा अंशभाग असल्याचे संदर्भ आढळतात

हा खास व्हिडीओ कुलबांधवांसाठी – अंदाजे 400 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या पुरातन वास्तूचे आणि आपल्या कुलदेवतेचे दर्शन पुन्हा एकदा परांजपे, देव, मंडलिक कुलबांधवांना व्हावे या हेतूने आम्ही श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर 2011 मध्ये बनविलेली चित्रफीत आमच्या महापर्यटन (Mahaparyatan.com) या वेबसाईटच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत. परांजपे, देव मंडलिक कुलबांधवांनी आणि भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मंदिराच्या जुन्या आठवणी परत जागृत कराव्यात. ही माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका ……………….. अजित नेने – राजेश भागवत

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismBharadechitpavan kuldaivatIndia Tourismkonkan TourismLakshminarayanmahaparyatanmaharashtra tourismparanjpe KuldaivatRATNAGIRI
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In