Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा... जलसंपदा मंत्री जयंत पाटील

‘दिलखुलास कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची उद्या मुलाखत

हिवाळी पर्यटन हंगामामध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 10, 2021
401 4
0
557
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

1 ऑक्टोबरपासून पर्यटकांना ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’

http://www.mtdc.co
Gandhi Tirtha – Jain Hills

महामंडळाच्या www.mtdc.co ( http://www.mtdc.co )  या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासनाने जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. पर्यटक देखील हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासाचे आरक्षण करून पर्यटनाचे नियोजन करू लागल्याचे दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुट्टीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली असल्याने महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co ( http://www.mtdc.co )  या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

एमटीडीसीमार्फत विविध घटकांना सवलती – महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्टयांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून  ‘कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपाहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे. काही रिझॉर्टवर वायफाय सुविधाही पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या पर्यटक निवासात राहून मुलांना ऑनलाईन क्लास तर पालकांना ऑनलाइन कामकाजही करता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co ( http://www.mtdc.co )  या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In