Friday, July 31, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेन्शन

‘ओटीएम २०२६’ महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
394 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आशियातील सर्वात मोठ्या ‘ओटीएम २०२६’ ट्रॅव्हल शो’मध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग

मुंबई – वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते. दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद त्यांनी साधला.

राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध  करून देण्यात आली.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या युवा पर्यटन राजदूत नवेली देशमुख यांनीही ‘ओटीएम’ कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन  दालनाला भेट देऊन दालनामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांशी संवाद साधला. तसेच नवेली देशमुख यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत कौतुक केले.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “‘ओटीएम’मधील सहभागाने निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास आहे. या माध्यमातून पर्यटनाला गती मिळून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘ओटीएम’ने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या या व्यासपीठाबाबत आयोजकांचे आभार मानतो.

”पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात सध्या पर्यटनाचा वाटा ७ ते ८ टक्के आहे. भविष्यात तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आउटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट’ (ओटीएम). राज्यातील पर्यटन उत्पादनांच्या प्रसारासाठी हे एक प्रभावी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे भागधारकांना जगभरातील कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमांमुळे येत्या काळात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात जागतिक भरारी घेईल.

”महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, “‘ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसा, गडकिल्ले, विविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल.

‘ओटीएम’मधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे”.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In