दिनाक 10.01.2025 रोजी बोरिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हनुमंत हेडे (उपसंचालक, पर्यटन कोकण विभाग), श्री. योगेश भामरे (संचालक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ), श्रीमती अक्षया सिंग (चीफ हेड, सारस्वत बँक) आणि डॉ. दीपक चौधरी (अध्यक्ष, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर) श्री सुधीर पाटील (संचालक वीणा वर्ल्ड) श्री जगदीश ठाकूर (अध्यक्ष पालघर जिल्हा पर्यटन संस्था) यांच्या उपस्थितीत झाले.या कार्यक्रमात नॉर्थ कोकण चेंबरने वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन केले, ज्यामध्ये प्रादेशिक उपक्रम आणि कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. मा. हनुमंत हेडे यांनी पर्यटन धोरण २०२४ आणि इतर पर्यटन धोरणांबद्दल सविस्तर माहिती देऊन कोकण क्षेत्राच्या विकासासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे केसरी टूर्सच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्ष सुनीता पाटील यांना पर्यटन क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.उद्घाटनानंतर, प्रदर्शन पाहण्यासाठी आणि विविध स्टॉल्सना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली. महाराष्ट्र आणि कोकण विभागातील पर्यटन स्थळांची माहिती घेण्यासाठी तसेच पर्यटन संचालनालयाशी संवाद साधण्यासाठी अभ्यागतांनी विशेष रस दाखवला. याचबरोबर, विविध पर्यटन धोरणांबाबतही लोकांनी माहिती मिळवली, ज्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला. या कार्यक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळाली असून कोकण प्रदेशाच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा घडून आल्या.उत्तर कोकण महोत्सव 2025 दिनाक 10 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 सकाळी 10.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत भाटिया हॉल,वीर सावरकर उद्यानाच्या समोर,बोरवली (पश्चिम) मुंबई येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल आणि रिसॉर्ट, गृह उद्योग, खाद्यपदार्थ , गृहसजावट ,इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड उत्पादने, कपडे- ड्रेस मटेरियल इत्यादी असे विविध प्रकारचे 100 स्टॉल असून या महत्त्वाचा आनंद घेण्याचे आव्हान श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले.
