Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

रविवारी आंतर जिल्हा १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

महागणपती रांजणगाव

भैरवनाथ मंदिर, दिवेआगर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 1, 2026
394 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

।। श्री सिध्दनाथ प्रसन्न ।।

नमस्कार

विषय :- चैत्र शुध्द चतुर्दशी यात्रा व गळी या बद्दल चैत्र शुध्द चतुर्दशीचा भैरवनाथ यात्रेचा उत्सव आपण गावकरी व चाळीस गावचे यात्रेकरू उत्सव साजरा करतो, त्यामागे परंपरागत इश्वरी अंश आहे ते आपणांस सर्वांना पहावयास मिळते. ही इश्वरी परंपरा कायमस्वरूपी वर्षानुवर्षे जोपासली गेली आहे. ती वर्षानुवर्षे टिकून रहावी अशी आपणासर्वांची इच्छा असली पाहीजे. या यात्रेचा विशेष म्हणजे गळी फिरविणे हा महत्वाचा इश्वरी अंश आहे. हे सिध्द होते. यात्रा या सर्वत्र होत असतात, पण भैरवनाथ यात्रेला गळाचे महत्व आहे. कारण सालाबादचा गळी दिवेआगर गावचा, प्रत्येक वर्षाचा दिवेआगर गांव रोगराईमुक्त व सुखी राहण्यासाठी भैरवनाथाचा हा जणू कौल आहे. म्हणूनच माझे वडील पुजारी श्री. तुकाराम बाळा विरकुड व आपण सर्व गांवकरी भैरवनाथाचे सवेकरी व यात्रा कमिटी मिळून आपणां सर्वांनी ही परंपरा जोपासली आहे. कारण सिध्दनाथाचा गळी विरकुड कुटूंबाचा मान असतो. तरी सर्व गांवकरी भैरवनाथाचे परडीवाले यांच्या सहकार्याने आदाने गळी फिरताना दिसतो. पाठीवर गळ टोचणे हा मान बोर्ली पंचतन येथील दिवेकर कुटूंबाचा असतो. नागवण उर्फ नाना दिवेकर, दगडू दिवेकर यांनी खुप वर्षे म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत गळ्याच्या पातला गळ टोचणे हा मान आवर्जून पार पाडला. शिवाय त्यांच्याकडून आम्हा लहानांस यात्रेसंदर्भात त्यांच अन्व. गमती शिकायला मिळत. त्यांच्या पच्छात नारायण दिवेकर उर्फ नाना दिवेकर यांचे चिरंजीव दिपक दिवेकर हे लहानवयापासूनच गळ्याच्या पाठीला गळ टोचणे हा मान पार पाडतात. हा सर्व प्रकार भैरवनाथाच्या कृपाआशिर्वादाने कार्यक्रम चांगल्या रीतीने होतो. गळी फिरताना लाट फिरविणे हा मान सुध्दा बोली विभागातील आगरी समाजातील मानकरी फिरवितात. या उत्सवात गळीची पाळणूक सुध्दा असते. उपवास पाण्याचा थेंब सुध्दा न घेता असतो. आपणा सर्वाना हे सुध्दा अनुभवास मिळते की, गावोगावी कसे संकटे वेत असतात शिवाय पुर महापुर येवून मानव हानी होत असते, तसे पहायचे म्हणजे आपल्या गावाला संकटे सुध्दा कृपा कुणाची ? भैरवनाथाचीच ना ! नाहीत ही

पूर्वी असाच एक प्रसंग आपल्या गावावर आला होता. तो प्रसंग म्हणजे रोगराईचा अस पुर्वजांच्या माहीतीनुसार ऐकीवात आहे. तेंव्हा पांडवांनी दिवेआगरचा ग्रामदेवत सिध्दनाथ भैरव यांना नवस केला होता तो असा, चैत्र शुध्द चतुर्दशीचा पाच फेऱ्या गळी फिरेल तेंव्हापासून आपल्या गावात संवाद येत नाहीत. पुर्वी बळी देणे ही प्रथा होती, नंतर बळी देणे ही प्रथा बंद झाली. पुर्वी एकवर्ष गळी फिरला नाही तेंका गावाला खुप त्रास सहन करावा लागला. नंतर पुन्हा प्रथा चालू कराव्या लागल्या. तेंव्हापासून आपल्या गावाल संकटे दुर झाली. म्हणून मला सांगावयास वाटते की, आपली परंपरा आपण सर्वांनी गावाच्या भल्यासाठी जोपासली पाहीजे. माझ्या वडीलांनी वयाच्या अठराव्या वर्षी गळ फिरण्यास सरूवात केली. काही वर्षी त्यांनीच गळ फिरणे पसंत केले. पुढील कुटूंबातील नवीन गळी फिरण्यास तयार झाल्यावर त्यांना आराम मिळाला. ते या वयातसुध्दा गळी फिरण्यास उत्सुक आहेत. आमच्या वडीलांनी आम्हा सर्वांना खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. शिवाय संकोच न ठेवता सर्व देवस्थानाविषयी सर्व माहिती आम्हास दिली आहे. या यात्रेमध्ये परडीवाले यांची खुप मोठी सेवा असते. ती म्हणजे गावातून देवाची परडी फिरविणे, जागोजागी न चुकता देवाचा मान देणे ही सेवा श्री. सुधाकर मोहिते आण्णा यांनी खुप वर्षे केली आहे. त्यामुळे परडिचा अनुभव त्यांना खुप आहे. तेसुध्दा आम्हाला प्रेमाने सर्व गोष्टी शिकवित असतात. आम्ही सर्व परडीवाले आणि सर्व सवंगडी त्यांच्याकडून माहिती घेत असतो. आताच्या तरूण पिढीला ते योग्य मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे आम्ही सर्व परडीतील सेवेकरी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आम्ही आमची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडत्तो.

गळी फिरताना त्याचा हसमुख चेहरा, त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे तेज म्हणजे भैरवनाथाची अगाय लिला हीच होय. जणू सर्व भक्तांच्या मनात बिंवबत असतो. आपण सर्व गांवकरी तसेच समस्त परडीवाले ही परंपरा अशीच चालू ठेवू या हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • श्री. मनोज तुकाराम विस्कुड
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In