Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

Sagar Sawali - Beach Resort, Ladghar

अशोक जैन यांचा राष्ट्रीय उद्योग रत्न या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 20, 2024
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

।। श्री सिद्धी महागणपती ।।

रिद्धीसिद्धीचा भाग्य विधाता, देव गजानन बुद्धीदाता। तो सुखकर्ता, तो दुःखहर्ता, चरण तयाचे धरू ।।

श्री गणपतीचे अखिलविश्वात पुजन केले जाते. गणपती हा चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय आणि सचिदानंद आहे. गणपती लौकीक सुखाचा दाता आहे. गणपतीची भक्ती, पूजा ही मनोभावे करणे ही वेगळी अशी आत्मानुभूती म्हणता येईल. ही अनुभूती प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ येथे अडीच एकराच्या विस्तीर्ण अशा मणियार इस्टेट परिसरात काळ्या पाषाणातील भारतातील सर्वात उंच श्री सिध्दी महागणपती मूर्ती आहे. यासाठी श्री सिद्धी महागणपती देवस्थान व श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान जळगाव हे कटिबद्ध आहेत.

श्री सिद्धी महागणपतीचे वैशिष्ट्यगत पाच वर्षांपासून तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील पाषाणाच्या विविध खाणी अथक परिश्रमाने पिंजून काढल्या गेल्या. तेव्हा कुठे प्रस्तावित मूर्तीयोग्य असा हा ग्रेनाईटचा अखंड काळा पाषाण आंध्र प्रदेशातील विजयवाडापासून १२० किलोमीटर दूर अतिदुर्गम भागातील खाणीत आढळला. हा पाषाण ३७४० क्युबिक फुट इतका प्रचंड मोठा आहे. आकारमानावरून वजनाचे सूत्र लावल्यास दहा क्युबीक फुट म्हणजे एक टन वजन होते ३७४० क्युबिक फुट म्हणजे तब्बल ३७४ टन येवढे प्रचंड वजन या पाषाणाचे आहे. या भल्यामोठ्या वजनाच्या पाषाणाची जळगावपर्यंत वाहतूक करणे अशक्य असल्याने खाणीच्या ठिकाणीच ७० मूर्तीकार ३१ फुटांहून अधिक उंच अशी भव्य श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती साकारली आहेत. त्यासाठी नुकत्याच एका मुहूर्तावर विधीवत मंत्रोचारात पाषाण पूजन सौ. इंदिरा व श्री. श्रीकांत मणियार, श्री. आनंदजी सारडा, श्री. मधुजी भट्टड, श्री. प्रसादजी (तिरुपती) यांच्याहस्ते करण्यात आले.

काळ्या पाषाणातील भारतातील भव्य गणपती मुर्तीआशियातील सर्वात मोठी गणेशमूर्ती ८५ फुटांची मोजली गेली आहे. ही मूर्ती कोल्हापूर जिल्ह्यातील टोप संभापूर येथील चिन्मय मिशन आश्रम येथे आहे. ती सिमेंटमध्ये साकारली आहे. त्या खालोखाल हरियाणातील बहादूरगढ येथे ७४ फुटांची सोनेरी रंगाची सिमेंटची मूर्ती असल्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. तसे पाहता सिमेंटचे आयुष्य १०० ते २०० वर्षे असते. पाषाण मात्र हजारो वर्ष टिकते. हा विचार करून पाषाणातील ही मूर्ती बनविण्याचे निश्चित केले. ३१ फुटांहून उंच अखंड पाषाणातून साकारलेली भव्य मूर्ती विदेशात तथा भारतात असल्याची माहिती उपलब्ध नाही. प्रस्तावित श्री सिद्धी महागणपतीची मूर्ती कदाचित भारतातीलच नव्हे तर आशियातली पहिलीच मूर्ती असावी. ही मूर्ती दक्षिण शैलीची व उजव्या सोंडेची आहे. गणपतीच्या हातात लाडू, पाश व अंकुश असतात, याशिवाय या मूर्तीच्या हातात दंत असेल. उजव्या सोंडेमध्ये अमृतकुंभ धारण करणार आहे. दंत आणि अमृतकुंभ हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. मूर्तीच्या आकारमानाला शोभेल असा सुमारे सव्या सहा फुटाचा मुषकराज सुद्धा विशेष आकर्षण असेल.

काळ्या पाषाणातीलच गणपती मुर्तीमूर्ती अखंड काळ्या पाषाणातच का? हा प्रश्न भाविकांच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक भौतीक वस्तूला ठराविक आर्युमान असते. हजारो वर्षापूर्वी च्या देवी देवतांच्या मूर्ती आजही सुस्थितीत अस्तित्वात आहेत हे लक्षात घेता मूर्ती किमान पाच हजार वर्षे तरी टिकेल यासाठी पाषाणाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. पाच हजार वर्षे अशासाठी की, प्राचीन ग्रंथांचा संदर्भ घेतला असता भगवान श्रीकृष्णाचे अवतार कार्य होऊन पुमारे पाच हजार वर्षे झालीत. तद्वतच ही मूर्ती देखील पाच हजार वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असावी हा त्यामागचा मोठा विचार आहे.

पांढरा शुभ्र संगमरवरी दगड मूर्तीसाठी वापरता आला असता, परंतू पांढऱ्या संगमरवरी दगडावर कालांतर वातावरणाचा परिणाम होऊन पिवळी छटा येते. काळ्या पाषाणाचे गुणधर्म हे वेगळे असतात. काळा पाषाण दिसायला आकर्षक तर असतोच परंतू कालांतराने गुळगुळीत होऊन त्याला चकाकी येते व अधिकच आकर्षक दिसतो. काळ्या पाषाणवर वातावरणाचा परिणाम होत नाही व हजारो वर्षे टिकतो. हा विचार करून श्री सिद्धी महागणपतीची भव्य मूर्ती काळ्या पाषाणात बनविण्याचे निश्चित केले.

२१ कोटी बिजाक्षरी गणेश मंत्राची शक्तीभारतातील वैशिष्ट्यपूर्ण गणपती देवस्थान म्हणून हे क्षेत्र नावारूपास येईल. उंच पर्वतासम भासणाऱ्या निसर्गस्थळी श्री सिध्दी महागणपती विराजमान होणार आहे. त्यामुळे भाविकांना गणपती दर्शन अगदी दूरवरून होणार आहे. ज्या ठिकाणी महागणपती विराजमान होतील त्या ठिकाणी पायामध्ये (Foundation) २१ कोटी बिजाक्षरी गणेश मंत्राची परम पवित्र शक्ती प्रस्थापित करण्यात येईल त्यावर विश्वातील भव्य अशा महागणपती मूर्तीची स्थापना होईल. त्यासाठी साडेचार हजारांहून अधिक भक्तांकडून ‘ॐ गं गणपतये नमः’ गणेश मंत्र लेखन म्हणजे सुमारे २१ कोटी इलकी मंत्रशक्ती होय या परमपवित्र मंत्रशक्तिच्या अधिष्ठानावर मूर्तीची स्थापना करण्यात येईल. २१ कोटी मंत्रांचे शक्तीवलय या ठिकाणी निर्माण होऊन अध्यात्माची वेगळी अनुभूती शताकानुशतके कायम अस्तित्वात असेल त्यासाठी एका मंत्र पुस्तकात ५१ हजार गणेश मंत्र लेखनाची व्यवस्था केली आहे. असे सुमारे ४५०० मंत्र पुस्तिका वितरीत केल्या आहेत. मंत्र पुस्तकात सुमारे २१ कोटी जप मंत्रांची शक्ती निर्माण करणाऱ्या भाग्यशाली भाविकांमध्ये आपलाही सहभाग आहे आहेच. मंत्र लेखनात सहभागी भाविकांचा मूर्ती प्रतिष्ठान मंदिर निर्माण सोहळ्यात यथोचित सत्कार संत महात्म्यांच्याहस्ते करण्याचे नियोजन केले आहे.

मंदिराचा १०५ फुटाहून अधिक उंच कळसमूर्तीच्या आकारमानाला साजेसे भव्य मंदिर प्रस्तावित आहे. मंदिराचा कळस हा सुमारे १०५ फुटांहून अधिक उंच राहील त्यामुळे भाविकांना मंदिराचे दर्शन अगदी दूरवरून होणार आहे. प्रवेशव्दार (राजगोपुरम) सुमारे १५० फुटाहून अधिक उंच राहील. भारतातील वैशिष्ट्यपूर्ण गणपती देवस्थान म्हणून हे क्षेत्र नक्कीच आपली ओळख निर्माण करेल. देवालयाचे गर्भगृह ५४ फुट उंच, ५१ फूट लांब व ५१ फुट रुद असे असेल. त्यात सुमारे ३१ फुटाची काळ्या पाषाणातील भव्य अशी बैठी श्री सिद्धी महागणपती मुर्ती विराजमान आहे . १५००० चौरस फुटांचा भव्य सभामंडप असणार आहे. या वैश्चिक, आध्यात्मिक वारीत आपण नक्कीच भक्तिभाव रसात न्हाऊन निघालं यात तिळमात्र संशय नाही……. जय श्री सिध्दी महागणपती

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In