Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री रुद्रेश्वर गणेश लेणी – Video

राज्यातील पहिले सौरग्राम बनण्याचा मान मान्याची वाडीला

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री

श्री रुद्रेश्वर गणेश लेणी – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
August 19, 2024
432 4
0
600
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हजारो वर्षांपूर्वीची आणि उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेली लेणी

श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात अंदाजे तीन हजार वर्षांपूर्वीची पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी आहे. हजारो वर्षांपूर्वीची आणि उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेली लेणी, निसर्गसौंदर्याने नटलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावजवळील लेणी.

महाशिवरात्रीला आणि श्रावणात भाविकांसह पर्यटकांची होते गर्दी | संपूर्ण विश्वाला आपल्या चित्र शिल्पांनी मोहिनी घातलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी छत्रपती संभाजी नगर शहरापासून अंदाजे ११० कि.मी. अंतरावर आणि जळगाव शहरापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर श्री रुद्रेश्वर गणेश लेणी स्थित आहे. अजिंठाच्या डोंगररांगेत भाविक आणि पर्यटकांसाठी अपरिचित असलेली हि पुरातन लेणी हजारो वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून आहे.

हिरवेगार सागाचे जंगल, झुळूझुळू वाहणारी नदी/झरे, खूप उंचावरून कोसळणारे धबधबे अशी निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे हा परिसर म्हणजे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. थोड्याशा आडवाटेवर असलेल्या या तीर्थक्षेत्राची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

या ठिकाणी कसे जायचे ? श्री रुद्रेश्वर गणेश लेणी हे ठिकाण जरी औरंगाबाद जिल्ह्यात येत असले तरी ते जळगावाशहरापासून पासून अगदी जवळ म्हणजे फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे. सोयगावपासून अवघ्या चार किमीच्या अंतरावर निसर्गरम्य अजिंठा डोंगर कुशीत गणेश (रुद्रेश्वर) लेणी वसलेली आहे. सोयगाव शहरापासून गलवाडा, वेताळवाडी मार्गाने पाच किलोमीटर पुढे गेल्यावर हळदा गावापासून रुद्रेश्वर लेणीकडे जाणारा फाटा आहे. स्वतःच्या वाहनाने आल्यास फाट्यापासून डावीकडे वळण घेऊन कच्च्या रस्त्याने आत जावे लागते. या मार्गावर पुढे जात असताना डाव्या हाताला सोयगावचे धरणाचा मोठा जलाशय तर उजव्या हाताला उंच डोंगरावर असलेल्या वेताळवाडी किल्ल्याचे मनोहारी दृश्य नजरेत भरते. नदी ओढे पार करत अतिशय निसर्गरम्य हिरवागार परिसर नजरेत साठवत अंदाजे दोन तीन किलोमीटर गेल्यावर रस्त्याकडेला वाहने उभी करून पुढे पायी जावे लागते. डोंगरातील बिकट आणि निर्मनुष्य असलेल्या पायवाटेने अंदाजे दोन किलोमीटरचा उभा चढ चढून आपण या स्थळापर्यंत पोहचू शकतो.

पावसाळ्यात चिखलामुळे घसरड्या झालेल्या या पायवाटेवरून डोंगर चढत असतांना खूप कसरत करावी लागते. त्यामुळे पर्यटक-भाविकांनी स्वतःची काळजीघेत रुद्रेश्वर लेणीपर्यंत जपून जाणे आवश्यक आहे. जांभूळ, सागाची झाडे आणि इतर वृक्षांनी वेढलेल्या या पाऊलवाटेवरून मार्गक्रमण करता असतांना मोरासह अनेक पक्षांच्या कुंजनाने हि वाट कधी संपूच नये असे वाटते. अतिशय निसर्गरम्य, शांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या या परिसरात देवदर्शनासह जंगल सफारीचा आनंद आपल्याला मिळतो. अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली गेली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. मोठ्या डोंगरात लेणी कोरल्यामुळे तिची भव्यता अधोरेखित होते.

या ठिकाणी तुम्ही काय बघाल – थोडी दमवणारी अवघड चढणीची वाट संपून आपण ज्यावेळी श्री रुद्रेश्वर गणेश लेणीजवळ पोहचतो त्यावेळी उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या मागे काळ्या पाषाणात कोरलेली पुरातन लेणी बघून जणू डोळ्याचे पारणेच फिटते. पावसाळ्यात प्रवाहित होणाऱ्या या धबधब्याखाली भाविक/पर्यटक सचैल स्नानाचा आनंद लुटतात. अंदाजे साठ फूट उंचावरून कोसळणाऱ्या जलप्रपाताचे पाणी कुंडातून पुढे थेट खोल दरीत प्रवाहित होतो. लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा हे पर्यटकांचे खास आकर्षण असल्याने ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात दुर्घटना घडत असल्यामुळे गर्दीच्या वेळी याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला जातो.

उंचावर असलेल्या या लेणीपरिसरातून सोयगावचे धरण आणि उंच डोंगरावर असलेलया वेताळवाडी किल्ल्याचे मनोहारी दृश्य दिसते. अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. मोठ्या डोंगरात लेणी कोरल्यामुळे तिची भव्यता अधिक अधोरेखित होते.

गुहेत असलेली सहा फुटी गणेश मुर्ती – अतिप्राचीन श्री रुद्रेश्वर गणेश लेणीपुढे मोडकळीस आलेल्या काही पायऱ्या उतरून काळ्या पाषाणात कोरलेल्या श्री रुद्रेश्वर गणेश लेणीजवळ जाता येते. समोरच असलेल्या धबधब्याच्या उजव्या हाताला असलेल्या एका छोट्याश्या प्रवेशद्वारातून आपण लेणीत प्रवेश करू शकतो. चिंचोळ्या गुहेतून थोडे आत गेल्यावर पन्नास फूट लांब आणि बारा फूट उंचीचा सभामंडप दिसून येतो. सभामंडपात प्रवेश केल्यावर मध्यभागी अंदाजे सहा फूट उंचीची आकर्षक भव्य गणेशमूर्ती आहे. गणेशमूर्तीच्या डाव्याउजव्या बाजूस रिद्धी-सिद्धी आहेत. कातळात कोरलेल्या महिरपीत शेंदूर लेपन केलेल्या डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते. मूर्तीशेजारी उजव्या बाजूस असलेल्या एका दगडी खांबावर भगवान नरसिंह आणि डाव्या बाजूस असलेल्या खांबावर नटराजाचे जीर्ण झालेले शिल्प आहे.

श्री रुद्रेश्वर महादेव – गणेश मूर्तीच्या डाव्या हातास असलेल्या चौथऱ्यावर महादेवाची भव्य पिंडी आहे. पिंडी समोरच काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम दिसून येत नाही. गुहेत काही काही पुरातन मुर्त्यांचे अवशेष भिंतीलगत दिसतात. या पुरातन गुहेतील कमानी आणि खांबांवर काळानुसार झीज होऊन पुसट झालेले नक्षीकाम दिसून येते.

वार्षिक सण उत्सव – श्रावण महिन्यात इथे जत्रा भरते. यानिमित्त लेणीजवळ बेल-फूल आणि प्रसादाची दुकाने थाटली जातात. शंभू महादेव आणि श्री गणेशाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येतात.

निवास, भोजनाची व्यवस्था होणे गरजेचे अजिंठा लेणी प्रमाणे रुद्रेश्वर लेणी आणि मंदिर देखील अतिप्राचीन असल्याचे मानले जाते. निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर, धबधबा, हिरवेगार डोंगर आणि लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी अनेक सुविधा देण्याची गरज आहे. या तीर्थक्षेत्राच्या तीन किलोमीटर परिसरात मनुष्य वस्ती नसल्याने निवास भोजनासह इतर सर्व सुख सोयी झाल्यास हे क्षेत्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू शकते. या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देखील मिळू शकतो.

लेणीला २००६-०७ साली तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे, मात्र कोणतेही विकास कामे झाली नसल्याची माहिती स्थानिक सांगतात. या परिसराच्या जवळपास निवास भोजनाची सोय होऊ शकत नाही. श्री रुद्रेश्वर गणेश लेणी जळगाव शहरापासून अवघ्या ६५ किलोमीटर अंतरावर असल्याने जळगावी मुक्काम करून एक दिवसाची ट्रिप अरेंज करू शकतो. येथून जवळच असलेला वेताळवाडी किल्ला हि पाहण्यासारखा आहे.

Tags: agro tourismAurangabad TourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRudreshwar
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In