Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटनविभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारे झेनॉन वाहन पालखी मार्गावर रवाना

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जवळील मार्गिकेवरच्या भेगेची तातडीने दुरुस्ती

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना शासनाकडून नुकसान भरपाई

पर्यटनविभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारे झेनॉन वाहन पालखी मार्गावर रवाना

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 13, 2024
399 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“आई” योजनेची संपूर्ण माहिती देणारी व्हिडिओ फित दाखवण्याची व्यवस्था

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, संचालक मा.डॉ.बी.एन. पाटील, पर्यटन विभागाच्या मा. सचिव श्रीमती जयश्री भोजआयएएस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले पर्यटनविभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देणारे झेनॉन वाहन दिनांक ८ जुलै २०२४ रोजी पालखी मार्गावर रवाना करण्यात आले.

त्यावर “आई” योजनेची संपूर्ण माहिती देणारी व्हिडिओ फित चालविण्यात येत आहे. तसेच पर्यटन विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना मिळेल अशी व्यवस्था करणेत आली आहे. सदर वाहन हे लोणंद फलटण परळ नातेपुते- माळशिरस – वेळापूर बंडी शेगाव वाखरी पंढरपूर मंगळवेढा या मार्गाने प्रचार व प्रसिद्धी करत जाईल. सदर वाहन पुणे विभागीय कार्यालयापासून रवाना करण्यात आले त्यावेळी उपसंचालिका श्रीमती शमा पवार व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

या वाहनासोबत “आई” या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता नियुक्त केलेले जिल्हा प्रकल्प अधिकारी स्वतः सहभागी असून ते गावोगावी वाहनासोबत फिरुन राज्यभरातून पालखी मार्गावार येणाऱ्या तसेच, पंढरपूर येथे माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक, वारकरी, शेतकरी बांधवांना पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची संपूर्ण माहिती देतील.

पर्यटन विभागाच्या वतीने शासन निर्णय क्रमांकः टिडीएस २०२२/१२/ प्र.क्र.७५०/पर्यटन, दिनांक १९ जून, २०२३ पारित करण्यात आला असून त्याद्वारे “आई” योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटन व्यवसाय हा पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे, हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा, हॉटेल, रेस्टॉरन्ट्सची मालकी ही महिलांची असणे बंधनकारक आहे, याखेरीज ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक असून पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.

टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक असून पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४९ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. मान्यताप्राप्त बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहेत. महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे.

Tags: agro tourismDot MaharashtraIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMtdc resorts
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In