
श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील, सर्वांवर कृपादृष्टी करतील… मा. यादव
यवतमाळ, दि.९ (जिमाका) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी कळंब येथे श्री चिंतामणी मंदीर देवस्थानला भेट दिली व चिंतामणीचे दर्शन घेतले. मंदीराच्या गाभाऱ्यात त्यांनी पुजा व आरती केली.मुख्यमंत्र्यांचे मंदीर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जावून चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पुजा व प्रार्थना केली. संस्थानच्यावतीने त्यांचा संस्थानच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील, सर्वांवर कृपादृष्टी करतील, असे ते यावेळी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.
यावेळी आ.डॉ.अशोक उईके, विवेकजी महाराज, संस्थानचे माजी अध्यक्ष चंदुभाऊ चांदोरे, सचिव बसवेश्वर माहुलकर, विश्वस्त शाम केवटे, चंद्रकांत गोसटवार, रमन बोबडे, शैलेश साठे, त्र्यंबक वाके आदी उपस्थित होते.पं.दीनदयाल प्रबोधिनीला भेटमुख्यमंत्री डॅा.
मोहन यादव यांनी यवतमाळ शहरानजीक असलेल्या पंडित दीनदयाल प्रबोधिनीला भेट दिली. याठिकाणी त्यांनी पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. संस्थेच्या कार्याची चित्रफित त्यांना यावेळी दाखविण्यात आली. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे आगमणप्रसंगी विमानतळावर स्वागतमुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचे जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमण झाल्यानंतर आ.मदन येरावार, आ.डॉ.अशोक उईके, राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.