Thursday, September 17, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु - अभिषेक देव

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त "विरासत" मैफिलीचे आयोजन

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार – मंत्री उदय सामंत

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 3, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा निधी

मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, किशोर जोरगेवार यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी सध्या ऑरगॅनिक बायोटेक या कंपनीकडून दरमहा मायक्रोबाएबल कल्चरचे मिश्रण तलावात सोडून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित असून अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या धर्तीवर ओझोनवर आधारित प्रक्रिया करुन चवदार तळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला 15 दिवसांत उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

महाड शहरातील चवदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेच्या स्व-निधीतून व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहिती मंत्री श्री.सामंत यांनी सभागृहात दिली.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPalces to see near Mahad
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In