Monday, July 27, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

मौजे हिरज येथील रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार

मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 22, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा

जळगाव | ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय हा जय घोष…’ यामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा संचालित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीच्या स्वागताचा ! 

गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानच्या पंढरीसाठी निघालेल्या पायी  पालखी, वारीचे स्वागत पौर्णिमेच्या नियोजित दिवशी करण्यात येते. रितीरिवाजानुसार जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे जैन परिवारातील सौ. ज्योती अशोक जैन, सौ. निशा अनिल जैन, सौ. शोभना अजित जैन तसेच  अथांग व सौ. अंबिका जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुलभा जोशी, मानव संसाधन विभागाचे पी. एस. नाईक, जी आर पाटील, एस. बी, ठाकरे, राजेश आगीवाल, सिक्युरिटी विभागाचे प्रमुख आनंद बलौदी,  आर. डी. पाटील, एम.पी बागुल, संजय सोनजे, अजय काळे, जीआरएफचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, अब्दुलभाई, गिरीश कुळकर्णी यांच्यासह जैन हिल्स येथील सुमारे ४०० स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मेहरुणच्या शिवाजी उद्यानातील संत मुक्ताबाई मंदिरात पुजेचा मान जैन इरिगेशनला दिला जातो. यावर्षी कंपनीच्यावतीने सहकारी अनिल जोशी यांच्याहस्ते ही पूजा केली गेली.

कंपनीच्यावतीने राजाभोज खानपान विभागाचे प्रमुख विजय मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच दिंडीची उत्तम क्षणचित्रे उपयोगात आणून कला विभागातर्फे  उत्तम अशी सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता करून दिली आहे, हे वाहन पालखी बरोबरच जाईल. या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते.

आजच्या या स्वागताचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्म आणि पायी चालण्याचे, वारीचे महत्त्व प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डॉ. अविनाश आचार्य स्कूल, भ.गो. शानभाग स्कूल आणि काशिनाथ पलोड हायस्कूच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घेण्यात आला होता. वारकरी स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात सहभागी विद्यार्थ्यांमुळे वारीला खरा अर्थ प्राप्त झाला.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In