Tuesday, May 20, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा म्हणजे एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश टाकणारे ठाणांग सूत्र ‘आगम वाचना’ - प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

नागपुरात लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा म्हणजे एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 11, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीस प्रतिसाद

जळगाव | चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात “गुढीपाडवा”. मराठी नवीन वर्षाचा आरंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. या ऋतूचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजनाने भाऊंच्या उद्यानात संपन्न झाला.

जळगावच्या गुणी कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटन म्हणून विकास तळेले (डेप्युटी रजिस्टर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) तसेच डॉ. मधुलिका सोनवणे (डायरेक्टर, विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले.

नववर्षाच्या स्वागतच सुरेल प्रवासाच्या या कार्यक्रमात श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, वरूण नेवे, अथर्व मुंडले तर साथसंगत केली प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) आणि निरूपण केले होते अनघा गोडबोले हे कलावंत सहभागी होते. कलावंतांचे सत्कार डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर यांनी केले.

सांज पाडव्यात ही गाणी सादर झाली तराणा आदीदेव महादेव राग यमन याने सुरवात झाली. यानंतर अनंता तुला कोण पाहू शके, त्या फुलांच्या गंधकोशी, पांडुरंग कांती, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, रुणुझुणू रुणुझुणू, तू सुखकर्ता, श्री राम चंद्र कृपाळू, हे सुरांनो चंद्र व्हा, नारायणा रमा रमणा, विश्वाचा विश्राम रे, मन मंदिरा, दिल की तापीश, मी राधिका, बाजे मुरलीया,भैरवी अवघा रंग एक झाला यानंतर धन्य भाग सेवा का याने उत्तरोत्तर रंगलेल्या सांज पाडवा मैफिलीचा समारोप झाला.

Tags: agro tourismChandorkar pratishthanGandhi research foundationIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास
Maha Tourism News

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

May 20, 2025
पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल
Maha Tourism News

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

May 19, 2025
आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 18, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In