Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही | लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबमध्ये अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार

राज्यातील पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही | लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबमध्ये अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 28, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन…

जळगाव l शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या शहरातच उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने या लॅबची शहरात उभारणी करण्यात आल्याचे तन्वीर पटेल यांनी सांगितले. आधी अनेक वेळा रुग्णांचे नमुने मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरात पाठवावे लागायचे त्यामुळे रिपोर्टसाठी रुग्णांना व नातेवाईकांना दोन तीन दिवस वाट पाहत बसावी लागायची, मात्र आता अवघ्या दोन तासात सर्व रिपोर्ट मिळणे शक्य होईल, ज्यामुळे रुग्णांना आपल्या आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी वेळ लागणार नाही.

अशोक जैन यांनी फित कापून केले उद्घाटन…
लुपिन डायग्नोस्टिक्स या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लॅबच्या उद्घाटना प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी हे देखील उपस्थित होते.

अशोक जैन यांनी लॅबच्या कार्याबाबत व तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती जाणून घेतली त्यांना मयूर सूर्यवंशी यांनी संपूर्ण कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. दरम्यान अशोक जैन यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या प्रयत्नांमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच गती मिळेल, आणि अनेकांना त्याचा लाभ होईल. रुग्णांचा व डॉक्टरांचा यामुळे मौल्यवान वेळ वाचेल. आणि अनेकांना योग्यवेळी योग्य तो उपचार मिळेल.

यावेळी लुपिन डायग्नोस्टिक्स चे सेल्स मॅनेजर योगेश परजणे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले, तर एरिया सेल्स मॅनेजर सागर शेलार यांनी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांचे स्वागत केले.
उद्घाटना वेळी लुपिन डायग्नोस्टिक्स च्या डॉ. रेणुका इथापे, योगेश परजणे, सागर शेलार, तन्वीर पटेल, विजय बोरणारे, केतन सोनवणे, प्रेम सोनार आदी. उपस्थित होते.

Tags: agro tourismHealth tourismIndia TourismJalgaon medical TourismLabsMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In