Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ उत्साहात संपन्न

निसर्गरम्य उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले

नागपुरात 13 ते 15 जानेवारीस 'जाणता राजा’ महानाट्य

सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ उत्साहात संपन्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 14, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला

सोलापूर l सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

अक्षता सोहळ्यासाठी खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्वश्री आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले, सर्वश्री माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, शिवशशरण पाटील, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्‍वस्त ॲड. मिलिंद थोबडे, मोहन डांगरे आदि उपस्थित होते.

या मुख्य सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून लाखो भाविक दाखल झाले होते.’शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय’ या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम… दिड्डम… दिड्डमचा उच्चार झाला अन्‌ चारही बाजूंनी अक्षतांचा वर्षाव झाला. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर योगदंडाबरोबर अक्षता सोहळा संपन्न झाला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील पारंपरिक अक्षता सोहळा भक्ती भावात पार पडला. श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. संमती कट्याजवळ गंगा पूजन व सुगडी पूजन झाले. मानकरी कुंभार यांच्याकडून दिलेल्या सुगडीचे हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजन केले. सत्यम सत्यम म्हणताच भाविकांनी अक्षता टाकल्या.

पालकमंत्री यांच्याकडून श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन-अक्षता सोहळा पार पडल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिध्देश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्री यांचा श्री सिद्धेश्वर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यात्रा समितीचे प्रमुख महादपा चकोते यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासन देत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ही सत्कार करण्यात आला.

Tags: agro tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismSidhheshwar मंदिरSolapur tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In