Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पण

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 21, 2023
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांनी महोत्सव प्रत्यक्ष अनुभवासाठी १४ जानेवारी पर्यंत भेट देण्याचे आवाहन

जळगाव l ‘प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा आणि फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघावी.’ असे आवाहन जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

जैन हिल्स वर १० जानेवारी २४ पर्यंत सुरू असलेला हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषि महोत्सवात शेतकऱ्यांसोबत रविशंकर चलवदे यांनीही प्रत्यक्ष पाहणी केली. तंत्रज्ञानातून पिकपद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल कसे करता येतील हे अनुभवले. त्यांच्यासोबत आत्मा जळगावचे उपसंचालक श्री. साळवे, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ संजय सोनजे, डॉ. विकास बोरोले यांच्यासह कृषीतज्ज्ञ होते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.तर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कृषी महोत्सवाची प्रत्यक्ष फिल्ड पाहणीसाठी ते आले होते. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच चर्चा करताना इतर शेतकऱ्यांनीही या महोत्सवात सहभाग घ्यावा यासाठी त्यांनी सांगितले की, ‘एकाच ठिकाणी वेगवेगळे पिकांची लागवड जैन हिल्स कृषि महोत्सवात दिसून आली. यात केळी हे आपल्या भागातील प्रमूख पिक आहे. आर्थिक चलनवलन यापिकातून मोठ्याप्रमाणात होत असते. त्यात सात ते आठ प्रकारची केळी लागवड, ठिबक व बेडवर लागवड, आठ महिन्यात आलेले पिक, ३० फूट उंचीचे केळीचे पिक अशी एकाच ठिकाणी विविध केळी पिकांची लागवड बघायला मिळत असल्याचे ते म्हणाले. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजून घेता येत आहे. तंत्रज्ञानासोबतच कुठले पिक घ्यावे, कसे घ्यावे, कुठली व्हरायटी लावावी असे एकच ठिकाणी वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे ते म्हणाले.

शिवाय हळद, अद्रक, टॉमोटो व कांदा सारख्या पिकांमध्ये समृद्धी मार्ग आहे. ह्यासंबंधीत अनेक व्हरायटीची माहिती याठिकाणी मिळते. कांदा हे आपल्या भागातील प्रमूख पिक घेतले जाते त्यात प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढरा लाल कांद्यासह अन्य जातींचाही पिकांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांना करता येत आहे. पांढऱ्या कांद्याच्या करार शेतीतून हमी भावाने कांदा व टमोटो खरेदी करून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल जात आहे. असे अनेक प्रकारांसह फळबागांमध्ये डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, लिंबू, पपई यासह अन्य फळपिकांची लागवड पद्धतीमध्ये बदल केला आहे. अतिसघन लागवड पद्धतीतून शेतकऱ्यांना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा मार्ग मिळत आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक, तुषार सिंचनासह अन्य पद्धतींसह ज्यांच्याकडे ५० ते १०० किंवा त्यापेक्षा मोठ्या क्षेत्रामध्ये जैन ऑटोमेशन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. यातून सिंचनासह फर्टिगेशन यंत्रणाद्वारे खतांचे नियंत्रण ठेवता येते व मजूरीवरील अतिरीक्त खर्च कमी करता येतो. एकाच ठिकाणी हे सर्व तंत्रज्ञान बघायला मिळत आहे. प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवित आहे. प्रत्यक्ष शेती बघायला मिळत असल्याने जळगाव सह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात सहभाग घ्यावा. फिल्डवर येऊन जिवंत पिकं बघायला मिळत आहेत.

दिवसभर जैन हिल्सच्या संशोधन विकास केंद्राचे प्रक्षेत्र भेट द्यावी, व्यवस्थेच्यादृष्टीने नोंदणी करावी’ असे आवाहनही जळगाव आत्माचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In