Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्रीमंत पेशवे यांचे इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक निर्मितीच्या दिशेने वाटचाल

राज्यात आवश्यक तेथे एअर ॲम्ब्युलन्सचा मार्ग सुकर होणार

व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम तीन वर्षासाठी देणार वाघनखं

श्रीमंत पेशवे यांचे इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक निर्मितीच्या दिशेने वाटचाल

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 5, 2023
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा…. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई l श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, मुख्याधिकारी (श्रीवर्धन) विराज लबडे, नारायण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रसाद पेंडसे, प्रतिनिधी अविनाश गोगटे, श्रेयस जोशी, लक्ष्मी नारायण देवस्थानचे प्रतिनिधी गजानन करमरकर उपस्थित होते.

यावेळी स्मारकाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा, अशी सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केली. देवस्थान समितीने स्मारकासाठी जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा केली, तरीही याबाबतीत काही अडचणी असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी स्थानिक ठिकाणी आवश्यक त्या परवानग्या विहीत वेळेत घेऊन या कामाला गती द्यावी. या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक आपल्या इतिहासाचे साक्षीदार ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन काम करावे. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटक, इतिहासप्रेमी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक होईल, अशी अपेक्षाही यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केली.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismरायगडश्रीवर्धन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In