Monday, July 27, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणली जाणार

पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न व आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणली जाणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 6, 2023
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

मुंबई l छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. श्री. मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृश्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी उद्योजकांनी हा प्रतिसाद दिला.

श्री.मुनगंटीवार यांनी लंडनस्थित मराठी उद्योजकांच्या ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अॅण्ड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप – यूके’ (ओमपेग – युके) या संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांसोबत आंतरजालीय दूरदृश्यप्रणालीद्वारे ही बैठक आयोजित केली होती. या संघटनेचे पदाधिकारी रवींद्र गाडगीळ, आशुतोष देशपांडे, अभिजीत देशपांडे आणि जय तहसिलदार यांच्या पुढाकाराने ही बैठक यशस्वी झाली. लंडनस्थित मराठी उद्योजकांनी महाराष्ट्राच्या वन खात्याच्या, सांस्कृतिक कार्य खात्याच्या आणि मत्स्यव्यवसाय खात्याच्या विविध कार्यक्रम आणि योजनांमधेही सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे यांचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय इतिहासातील महत्त्व, शिवराज्याभिषेकाचा यंदा होणारा त्रिशतकीय सुवर्णमहोत्सव, त्यानिमित्ताने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेले विविध कार्यक्रम यांची माहिती दिली. ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांसोबत जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याविषयी झालेली प्राथमिक चर्चा यांची माहिती दिली. ब्रिटनमधील भारतीय आणि विशेषतः मराठी लोकांनी ब्रिटिश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहून जगदंब तलवार आणि वाघनखे भारताला परत देण्याची मागणी करावी असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले. त्याप्रमाणे ब्रिटीश सरकारला मोठ्या प्रमाणात पत्रे लिहिण्याचा निर्णय आणि त्याकामी ब्रिटनस्थित सर्व भारतीयांचा सहभाग घेण्याचाही यावेळी ‘ओमपेग-युके’ च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर विविध ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी आणि ब्रिटिश सरकारमधील उच्चपदस्थ राजकारणी यांच्या भेटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारताला परत करण्याची मागणी करण्याचाही निर्णय या संघटनेने घेतला आहे.

श्री. मुनगंटीवार हे जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात आणण्यासंदर्भात ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्याकरता जेव्हा लंडनला जातील, तेव्हा त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आणि या दैवी कार्यात आवश्यक तो सर्व सहभाग देण्याचे लंडनस्थित मराठी उद्योजकांनी या बैठकीतून आश्वासन दिले आहे. त्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लंडनस्थित मराठी उद्योजकांनी ब्रिटनमधील इतर व्यवसायातील मराठी सोबतच अन्य भारतीय व्यावसायिक व नोकरदार मंडळींना याकामी सोबत घ्यावे, असे आवाहनही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. त्याला लंडनस्थित मराठी उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Tags: agro tourismchatrapatiIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In