Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘जत्रा आंब्यांची’ प्रदर्शनास कोल्हापुरात उत्तम प्रतिसाद

गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळा उत्साहात

नदीची स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज

‘जत्रा आंब्यांची’ प्रदर्शनास कोल्हापुरात उत्तम प्रतिसाद

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 6, 2023
403 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंब्यांच्या विविध 52 जातीसह दुर्मिळ आंब्यांच्या जाती बघण्यासाठी होतेय गर्दी

आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा… पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर l आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शाहू मिल येथे आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘जत्रा आंब्यांची’ हा अतिशय चांगला उपक्रम असून आंबा उत्पादकांना याचा निश्चितच लाभ होईल. याठिकाणी आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या आंब्याच्या प्रदर्शनामध्ये नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले.

पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले म्हणाले, करवीरवासियांना नैसर्गिकरित्या पिकवलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केशर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी हा महोत्सव 14 मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत आयोजित केला आहे. आहे. सर्व कोल्हापूरकरांनी आंब्याच्या जत्रेला भेट देऊन प्रदर्शन पहावे आणि आंब्याचा स्वाद घ्यावा, असे आवाहन केले.

आंबा प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या विविध 52 जाती पाहण्यासाठी व माहिती होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये जहांगीर पसंत, गोवा मानकूर, हापूस, सुपर केशर, करण जिओ, मबाराम, तोतापुरी, वनराज, बनारसी हापूस, दूध पेढा, वेलाई कोलंबन, रुमानी, सब्जा, केशर, करेल, मुशराद, बाटली, बबेंगलोर गोवा, मलीका, बदाई गोवा, बदामी, उस्टीन, लिली, सिंधू, आम्रपाली, माया, केंट, निलम, रायवळ, लंगडा, पायरी, टॉम ऑटकीन, बारमाही, जम्बो केशर, बारमासी, बनेशान, इस्रायली, पामर, किट, फर्नांडिस, बिटक्या, दशहरी, कोकण सम्राट, रत्ना, सोनपरी, सिंधू, फ्रान्सिस आदी दुर्मिळ आंब्यांच्या जाती आहेत. केशर व हापूस आंबा रोपे याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

Tags: agro tourismIndia TourismkokankonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismकोल्हापूर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In