Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटनाला चालना देण्यासाठी  ‘देखो आपला महाराष्ट्र’ टूर

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

आदर्श पर्यटन जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्या ओळखला जाणार ?

पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो आपला महाराष्ट्र’ टूर

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 30, 2023
407 4
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत टुर पॅकेज जाहीर

मुंबई l राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज दि. ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून सदर टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन) सौरभ विजय, व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400 च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्र किनारा, व्याघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, जणू प्रत्येकासाठी इथे काहीना काही आहेच.

सह्याद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात.

अजिंठा व वेरुळच्या लेण्या ह्या सर्वांनाच भूरळ घालतात. कोकणात गणपतीपुळे, तारकर्ली सारखे समुद्र किनारे असंख्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव, नाशिक मधील मंदिरे, पुण्यातील संस्कृती आकर्षण ठरत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे बघूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटक निवास (MTDC Resort) व उपहारागृह (Restaurant) उघडले आहेत. यामुळे पर्यटनांसाठी राहण्याची, खाणपाणाची सोय या पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतून प्राप्त झाल्या आहेत.

पर्यटक आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासातून मनसुक्त भ्रमंती करु शकतात. एमटीडीसी पर्यटक निवासाचे जाळे तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, माथेरान, खारघर एलिफंन्टा, टिटवाळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक, कार्ला, शिर्डी, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, छत्रपती संभाजी नगर, अजिंठा, वेरुळ, भिमाशंकर, ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, चिखदरा इत्यादी ठिकाणी पसरले आहेत.

दि.01 मे 2023 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 75 टुर पॅकेज सुरु करत आहेत. या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल.

अनुभावत्मक पर्यटन अंतर्गत कोकणातले काताळ शिल्प, विदर्भातले वन्यजीव, भंडारदरा येथील निसर्ग भ्रमंती, गिर्यारोहण, अवकाश निरीक्षण, कांदळवन इत्यादींचा अनुभव घेता येईल. सोबत गाईडची साथ असणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विश्वास आहे की, या टुर पॅकेज मधून पर्यटकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रत्येक व्यक्ती जाण्यास उत्सुक राहील.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    by Rajesh Bhagwat
    May 11, 2025
    पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न छत्रपतींच्या… Read more: छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    जळगाव | जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील… Read more: जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी
  • फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    जळगाव | मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत… Read more: फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी
  • बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम… ३९ मचाणांद्वारे होणार प्राणीगणना
    by Rajesh Bhagwat
    May 10, 2025
    बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, साळिंदर, नीलगाय,… Read more: बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम… ३९ मचाणांद्वारे होणार प्राणीगणना
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती
    by Rajesh Bhagwat
    May 9, 2025
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती… Read more: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In