Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा – Video

महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूच्या उत्पादनांची विदेशी पाहुण्यांना भुरळ

उत्तम आरोग्यासाठी बहरलेले वन

श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 25, 2023
450 5
0
625
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उजव्या आणि डाव्या सोंडेचे असे दोन गणेश मुर्ती एकाच सिंहासनावर विराजीत असलेले जगातील एकमेव असे मंदिर

जळगाव l जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’  दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.२३ मार्च रोजी) झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती.

जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.  पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आहे.

पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडेचे गणपती आहे.

जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या मस्तकचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे.

सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भली मोठी घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य जाते आहे. पद्मालय मंदिरापासून जवळच भिमकुंडही आहे. याच ठिकाणी भीम आणि बकासुर यांच्यात जी निर्णायक लढाई याच ठिकाणी झाली असल्याची अख्यायिका सांगितली जाते.

श्री पद्मालय गणेश देवस्थानास  ‘ब’  दर्जा मिळावा यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते. आणि त्यास अखेर यश येऊन  ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांचा  ‘ब’  दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे,  ‘ब’  दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती पुर्तता करण्यासाठी ग्रीन स्टोन इंजिनीअरींगच्या आर. एस. महाजन यांनी परिश्रम घेतले आहे.

अनेक वर्षांपासून श्री. गणपती मंदिर देवस्थान पद्मालयला ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांनी  ‘ब’ दर्जा मिळाला  आहे. ही आनंददायी बाब आहे. आता लवकरच या परिसरात नियोजीत असलेल्या कामांना वेग देऊन ती पुर्ण होतील व मंदिर आणी परिसराचा विकास होईल.  यामुळे या ऐतिहासीक देवस्थानाचा विकास होऊन येणाऱ्या भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे. अशी प्रतिक्रिया श्री.अशोक जैन , अध्यक्ष, श्री गणपती मंदिर देवस्थान , पद्मालय यांनी दिली आहे.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPadmalayaPlaces to be visited Near JalgaonTourism places near Jalgaonश्री पद्मालय देवस्थान
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In