Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट

जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर होणार

गेट वे ऑफ इंडिया येथे दर शनिवारी आणि रविवारी 'मल्टी मीडिया अँड साऊंड शो'

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 28, 2023
409 4
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या

औरंगाबाद l जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज  शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली.  शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या.

औरंगाबाद लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.

औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून ७० फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौद्ध धर्माला समर्पित एकूण १२ लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात १ ते ५ पर्यंत दुसऱ्या गटात ६ ते ९ आणि तिसऱ्या गटात १० ते १२ लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिसऱ्या ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत.

पहिल्या गटात लेणी क्र. १ ही अपूर्ण लेणी आहे. ज्यामध्ये व्हरांडा आणि स्तंभ आहेत लेणी क्र. २ आणि ५ या समकालीन संरचनात्मक मंदिराप्रमाणे दिसतात जे शैलकृत उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेत. लेणी क्र. ३ ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी लेणी आहे, हे एक महाविहार आहे. ज्यामध्ये प्रदक्षिणापथ सोबतच गर्भगृह आहे. यावरील स्तंभांवर पर्णसंभार, मिथुन शिल्प आणि जातक कथा कोरलेल्या आहेत. लेणी क्र. ४ हे हिनयान काळातील एकमात्र चैत्यगृह आहे.

दुसऱ्या गटातील लेणी ही पहिल्या गटाच्या उत्तर पूर्वेस सुमारे साधारणतः १ कि.मी. अंतरावर आहे. लेणी क्र. ६ अ आणि ७ विहार आहेत. जे तेथील विवरणत्मक शिल्पे आणि सुंदर प्रतिमांकरिता प्रसिद्ध आहेत. लेणी क्र. ८ आणि ९ या अपूर्ण उत्खननामुळे आपल्याला लेणी निर्माण करण्याची प्रक्रिया माहिती होते. या गटातील लेणी प्रतिमा शिल्पांनी युक्त आहेत आणि औरंगाबाद लेण्यातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. यात बोधीसत्व, अष्टमहाभय, अवलोकितेश्वर, पट-प्रज्ञा देवी सोबतच बोधिसत्व, हारिती पंचिका, नृत्य वादनच्या दृश्यांचे पटल, महापरिनिर्वाणाचे दृश्य तसेच स्तंभावर पर्णसंभार आणि भौमितिक आकृत्यांचे सुंदर अंकन केले आहे.

तिसऱ्या गटातील लेणी क्र. १० आणि १२ दुसऱ्या गटापासून थोड्या अंतरावर उत्तरेकडे स्थित आहेत लेणी क्र. १० आणि ११ अर्धनिर्मित लेण्या आहेत तर लेणी क्र. १२ एक विहार आहे.

औरंगाबाद लेणी पाहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघड्यांच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले.

मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून जी 20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त  – जी-२० परिषदेसाठी शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधीनी आज सकाळी  बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन  पाहुण्यांचे स्वागत  करण्यात आले. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद  व्यक्त केला.

यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. यावेळी इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली.

मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर  चहापाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. ‘आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष’ असल्याने या मध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता. यात मूग, मटकी, ज्वारी या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी .बी नेमाने, पुरातत्व अधीक्षक श्री.भगत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर  लाड तसेच पोलीस विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismAjanthaAurangabad TourismG20India TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In