Friday, September 18, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक

गेट वे ऑफ इंडिया येथे दर शनिवारी आणि रविवारी 'मल्टी मीडिया अँड साऊंड शो'

शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 2, 2023
408 4
0
567
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत

कोल्हापूर l संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल तर वेळीच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. हे लक्ष देत असतानाच पर्यावरण संवर्धनासाठी लोक जागृती व लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.

कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भैय्या जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिध्देश्वर स्वामी महाराज आदी उपस्थित होते.

गेहलोत पुढे म्हणाले की, संत, ऋषी, मुनी यांनी प्राचीन काळापासून पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद केले आहे. पर्यावरणाच्या मुद्याकडे आपणाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या सर्वांना कटिबध्द व्हावे लागेल. साधु, संतांच्या मार्गदर्शनात समाज आपले आचरण, अनुसरण करतो. या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या साधु संतांनी पर्यावरणाच्या दृष्टीने समाजाला प्रेरित करावे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचेही गेहलोत म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब असल्याचे गौरवोग्दार काढून भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत असे सांगून मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखीन पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे गौरवोग्दारही त्यांनी यावेळी काढले.हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधु संतांच्या वतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.

प्रारंभी काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागय्याजी यांनी तर आभार प्रदर्शन स्वामी परमानंद यांनी केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या विविध जाती-धर्माच्या साधू संतांचे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न झाले.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या माणसांशी जोडणारा भावनिक सोहळा आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून दरवर्षी हजारो चाकरमानी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या कोकणातील गावी परततात.यंदाच्या गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ५,२२० जादा बसगाड्या सोडण्याचा मेगाप्लॅन आखला आहे. ही सेवा गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना कोकण गाठण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 🌺 कोकणातील गणपती म्हणजे घरवापसीचा उत्सव!कोकणात गणपती उत्सवाला विशेष महत्त्व आहे. मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले अनेक चाकरमानी वर्षभर आपल्या गावातील गणपतीची आतुरतेने वाट पाहतात.गणपतीच्या काही दिवस आधीच गावाकडे जाण्याची लगबग सुरू होते. लालपरीतून किंवा खासगी… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने २९ जुलैपासून ‘मार्ग क्र. ९ए (Route 9A)’ या नव्या पर्यटन बस सेवेची सुरुवात केली आहे. अवघ्या ₹५०० प्रति प्रवासी या माफक शुल्कात मुळशी परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची एकदिवसीय सफर करता येणार आहे. मान्सून पर्यटनाला मिळणार नवी दिशा – पावसाळा सुरू होताच मुळशी परिसर हिरवाईने नटतो. धुक्याने वेढलेले डोंगर, फेसाळणारे धबधबे, शांत जलाशय आणि प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. याच पार्श्वभूमीवर, खास पर्यटकांसाठी किफायतशीर आणि सुरक्षित पर्यटनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने PMPML ने ही पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.खासगी वाहन किंवा… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित,… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीची लिंक व अधिक माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा अचूक दिनांक, स्वरूप आणि पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील होतकरू स्कोअरर्स… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री राम”च्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली.धुळे रेल्वे स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमांस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जि.प समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, आयआरसीटीसीचे नवीन कुमार सिन्हा, इंडियन रेल्वे… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In