
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 160 वी बैठक संपन्न
मुंबई l दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना पहिल्या वर्षी जागेच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळते. तर, दुसऱ्या वर्षापासून नियमानुसार पूर्ण भाडे आकारले जाते. मात्र, आता दुसऱ्या वर्षीच्या भाड्यामध्ये 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 160 वी बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चित्रपट अनुदान प्रक्रिया सुधारून ती कालबद्ध करावी. तसेच महामंडळ आणि चित्रनगरीच्या विविध सेवा या ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गतिमान करण्यात येईल. चित्रनगरीची सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्यासाठी विविध पर्यायांसह डिजिटल करण्याच्या प्रस्तावास त्यांनी संमती दिली.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे निर्मिती संस्थांना आर्थिक दिलासा मिळणार असून अधिक सुरक्षित वातावरणात चित्रिकरण करता येणार आहे. चित्रनगरीचा कायापालट करण्यावर भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात चित्रनगरी लवकरच मोठी झेप घेईल असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.यावेळी महामंडळाच्या संबंधी विविध ठरावांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात चित्रनगरीच्या परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न आदी विषयांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.
बैठकीला सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, उप सचिव विद्या वाघमारे, उप सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी सई दळवी, मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय भालेराव, उप अभियंता (सिव्हिल) संतोष कुमार मुरुडकर, सहायक प्रशासन अधिकारी तुकाराम खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.घोसाळकर आदी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
- गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेसगणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
- PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन




