नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊसपडून झाली होती अतिवृष्टी
मुंबई l पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
ढगफुटीसदृश पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (6)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,500)
- Mahaparyatan Business (4)
- Sports / क्रीडा (12)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (17)
- कथाकथन / प्रवासवर्णन (2)
- कृषी पर्यटन (17)
- कृषी माहिती आणि उत्पादने (108)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (12)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (26)
- प्राचीन देवस्थाने (52)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (34)
- समुद्रकिनारे (16)
- साहसी पर्यटन (6)