Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पद्मालय गणपती – Video

रिद्धपूरच्या विकासासाठी प्रयत्न... उपमुख्यमंत्री फडणवीस

अयोध्या व काशी विश्वनाथच्या धर्तीवर चक्रधरस्वामींच्या जन्मस्थळाचा विकास

पद्मालय गणपती – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
459 4
0
637
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डाव्या, उजव्या सोंडेचे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान असलेले जागृत देवस्थान

शेकडो कमळांनी बहरलेल्या एका सुंदरशा तळ्याकाठी वसलेले देवस्थान

श्री क्षेत्र पद्मालय हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात असलेल्या एका सुंदरशा तळ्याकाठी वसलेले आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत. प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या आकर्षक गणेश मूर्ती अतिशय जागृत असल्याची श्रद्धा असल्याने वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी या क्षेत्री असते.

पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही मात्र आजूबाजूचा परिसर याच नावानं ओळखला जातो. जळगाव पासून ३० किलोमीटर आणि एरंडोल पासून १२ किलोमीटर अंतरावर हे स्थान असून एसटी बस अथवा खाजगी वाहनाने या क्षेत्री आपण येऊ शकतो. मध्य रेल्वेच्या भुसावळ/मुंबई रेल्वे मार्गावरील म्हसावद रेल्वे स्थानकापासून आठ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. जळगावहून म्हसावद मार्गे आल्यास डोंगरमाथ्यावर थोड्याश्या चढणीच्या रस्त्याने पुढे आल्यावर श्री गणेश मंदिराच्या कळसाचे लांबूनच दर्शन घडते. मंदिराच्या अगदी समोरच शेकडो लाल आणि पांढऱ्या कमळांची बहरलेला सुंदर तलाव आहे.  ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या स्थानाला पद्मालय हे नाव पडले असावे.  मंदिराच्या दोन दिशाना तळ्यात उतरणाऱ्या पायऱ्या असलेला दगडी घाट बांधलेला दिसतो. 

हे मंदिर भारतातील अडीच गणेश पिठांपैकी अर्धे पीठ असल्याचे मानले जाते . मोरगावचा मयुरेश्वर आणि राजूर येथील महागणपती हि दोन पूर्ण पिठे तर पद्मालय येथील प्रवाळ गणपती क्षेत्र अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या गणेश पुरणात या देवस्थानाचा उल्लेख आढळतो. काळ्या पाषाणापासून बांधल्या गेलेल्या या गणेश मंदिराचे बांधकाम पुरातन असून ते कुणी बांधले याबाबतची माहिती उपलब्ध नाही. मात्र हे देवस्थान ५०० वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे.

मंदिरावर ९० फुटी उंच कळस बांधलेला आहे. मुख्य कळसाभवती आठ छोटे उप-कळस असून सोन्याच्या पत्र्याने मढवलेले आहेत. दगडी कळसावर यक्ष, किन्नर आणि वीणा वादन करणाऱ्या नारदमुनीं यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर दोन भल्या मोठ्या हातींचें शिल्प आहे . संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून अतिशय सुंदर असेच आहे. मंदिर परिसरातील इतर वास्‍तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले असल्याचे दिसून येते. मुख्य देवालयाच्या चहूबाजूस गणपतीची छोटीछोटी देवळे आहेत.

मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेरील परिसरात  पूजासाहित्य, न्याहारी/भोजन व्यवस्था असलेली असंख्य छोटीछोटी दुकाने थाटलेली आहेत. एका भव्य दगडी कमानीखालून आपण मंदिर परिसरात प्रवेश करू शकतो. तलावाकाठी असलेल्या पायवाटेवरून थोडं पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक सव्‍वा तीन फूट व्‍यासाचे अवाढव्‍य दगडी जाते दिसून येते. पूर्वीच्‍या काळी धान्‍य दळण्‍यासाठी अशा प्रकारच्‍या लहान जात्‍यांचा वापर घराघरात होत असे. येथे असलेल्‍या जात्‍यास त्याच्या मोठ्या आकारावरून ‘भिमाचे जाते’ म्‍हणून संबोधले जाते. मंदिर जीर्णोद्धाराच्या काळात या जात्यास दोन बैल जुंपून गोल फिरवून धान्याचे बारीक पीठ केले जायचे . त्याकाळी हजारो लोकांसाठी महाप्रसादची व्यवस्था या जात्यातून निघालेल्या पिठापासून तयार केली जायची.  

मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे श्री सिद्धेश्वराचे छोटेसे देऊळ आहे. हे देवस्थान फार पुरातन असून १८२४ साली या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिराच्या दर्शनी भागात कोरलेला आहे. श्री सिद्धेश्वराच्या पिंडीसमोर भाविकांसाठी पूजाअर्चेची व्यवस्था केलेली आहे.

मुख्य मंदिरासमोर तीन बाजूने तलावाच्या पाण्याने वेढलेल्या एका छोट्या देवळीत श्री गोविंद शास्त्री बर्वे यांच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.  सन  १८९५ ते १९३५ या काळात या सिद्ध पुरुषाचे वास्तव्य या क्षेत्री होते. गोविंद शास्त्री यांनी जुन्या देवळाचा जीर्णोद्धार करून भव्य नवीन मंदिर बांधले. पादुका असलेल्या  या देवळीच्या डाव्या उजव्या बाजूस दोन दगडी हत्ती शिल्प आहेत.

मंदिराच्या अगदी सोमोरच साडेचारशे किलो वजनाची सुंदर नक्षीकाम केलेली पंचधातूची अवाढव्‍य अशी पुरातन घंटा आपल्याला बघायला मिळते. हि घंटा काशी येथे घडवली गेली असून त्यावर ”श्री प्रवाळ क्षेत्र वासीने धरणी धराय नमः” असा मजकूर ओतीव घडणावळीत कोरलेला आहे.

मोठा सभागृह आणि त्यापुढे गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टीस पडतो तो श्री गणेशाचे वाहन असलेला मूषक. चार साडेचार फूट उंचीच्या भव्य उंदराने हातात मोठ्ठा लाडू धरलेला आहे. गर्भागृहाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला आमोद/प्रमोद द्वारपाल भाविकांचे स्वागत करतांना दिसून येतात.

मुख्य गाभार्यात डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा असे दोन गणपती विराजमान आहे . चांदीचे मुकुट धारण केलेल्या या मूर्तीवर दररोज जास्वंद आणि कमळांच्या फुलांची आरास केली जाते. मूर्तींमागे चांदीची प्रभावळ आहे . गाभार्यात चांदीचे  खांब असलेल्या मखरावर  रिद्धिसिद्धिच्या मूर्ती आहेत. संपूर्ण जगात श्री क्षेत्र पद्मालय हे असे तीर्थक्षेत्र आहे जेथे प्रवाळरत्न स्वरूपात प्रकट झालेले डाव्या आणि उजव्या सोंडेचे असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. मंदिरातील या दोन गणेश मूर्ती पैकी एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्‍याचा उल्‍लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो.

Agastya Sea View Apartments, Dapoli

गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला या तीर्थक्षेत्री मोठी यात्रा भरते. या पुण्यपर्वात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी पद्मालय  येथे येतात. माघ शुद्ध चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही थाटात साजरा करण्यात येतो. नवसाला पावणारा गणपती असल्याची भविकांची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागतात.

या स्थानाचे महत्व जाणून थोरले माधवराव पेशव्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी खान्देश सुभ्यातील ३७ परगण्यांचा निम्मा महसूल पद्मालय देवस्थानास दिला होता . पद्मालय मंदिर संस्थानाला पेशव्यांची सनद मिळाली असल्याने हे देवस्थान अतिशय पुरातन असल्याची खात्री पटते. मुख्य मंदिराच्या भोवती चार दिशांना श्री गणेशाची एकूण एकवीस मंदिरे आहेत.

मंदिरा पासुन एक किलोमीटर अंतरावर एका खोल दरीत असलेले भीमकुंड हे म्हणजे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. पांडव अज्ञात वासात असतांना  भीम आणि बकासुर राक्षसाचे युद्ध येथे झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धात बकासुर मारला गेल्यानंतर तहान लागल्यावर भीमाने  खडकावर प्रहार करून  खड्डा निर्माण केला.  त्यातून वर आलेले पाणी प्राशन करून भिमाने आपली तहान भागवली होती, ते भीम कुंड आज देखील या ठिकाणी पाहायला मिळते.

भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळालेल्या मोर या पक्षांचा वावर मंदिर परिसरात असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असल्याने या काळात मोठ्ठा पिसारा फुलवून नाचणारे अनेक मोर मंदिर परिसराच्या आसपास पाहायला मिळतात. पावसाळ्यात मोराने फुलवलेला पिसारा बघण्यासाठी अनेक जण मुद्दाम येथे येतात.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismfamous gansesh temple jalgaonIndia TourismJalgaon Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to be visited Near Jalgaonplaces to see near jalgaonratnagiri tourismTourism places near Jalgaon
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In