पात्र व्यावसायिकांना दहा लाखांपर्यंत अर्थ सहाय्य
कोकणातील पर्यटन व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी बँक ऑफ इंडिया व पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विदमाने दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी दापोली येथे एका विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडियाचे वित्तीय सहाय्य आणि पर्यटन संचालनालय यांच्या पर्यटन व्यावसायिकांसाठी असलेल्या विविध योजनाबद्दल माहिती देण्यासाठी या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री. हनुमंत हेडे उपसंचालक, पर्यटन संचालनालय यांनी Mahaparyatan च्या माध्यमातून दीली आहे.
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमस्टे, कृषी पर्यटन व्यावसायिक यांना व्यवसाय वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे. श्री. हनुमंत हेडे उपसंचालक, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि श्री. संतोष सावंत देसाई क्षेत्रिय प्रबंधक, रत्नागिरी क्षेत्र बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.
कोकणात रोजगार निमिर्तीसाठी मोलाचे कार्य राज्य पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि बँकेच्या माध्यमातून केले जात आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कोकणातील व्यवसायिकांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी व नवउद्योजकास व्यवसाय वाढीसाठी म्हणून आर्थिक सहाय्य ही केले जाणार आहे. बँक ऑफ इंडिया तर्फे पर्यटनावर अवलंबून असलेल्या पात्र व्यावसायिकांना दहा लाखांपर्यंत अर्थ सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती ही श्री. हनुमंत हेडे यांनी दिली. या शिबिराचा लाभ जरूर घ्यावा.
- ठिकाण : दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज सभागृह, दापोली.
- दिनांक : मंगळवार, दि. ०९ ऑगस्ट २०२२
- वेळ : सकाळी १०.०० ते ०१.०० वा.

- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
- English (5)
- Live Links (1)
- Maha Tourism News (1,598)
- Mahaparyatan Business (5)
- Mahaparyatan Marketing (1)
- Sports / क्रीडा (13)
- Uncategorized (10)
- ऐतिहासिक ठिकाणे (22)
- कथाकथन / प्रवासवर्णन (3)
- कृषी पर्यटन (20)
- कृषी माहिती आणि उत्पादने (111)
- खाद्य भ्रमंती (7)
- गड, सागरी किल्ले (19)
- धबधबे (6)
- परंपरा / सण / उत्सव (28)
- प्राचीन देवस्थाने (58)
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
- समुद्रकिनारे (17)
- साहसी पर्यटन (9)
