Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
‘आंबा जत्रेत’ वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे बघण्यासाठी होत आहे गर्दी

मांघर गाव देशातील पहिले ‘मधाचे गाव’ l Honey Village l म्हणून घोषित

पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा देण्यासाठी खाजगी उद्योजकांबरोबर करार

‘आंबा जत्रेत’ वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे बघण्यासाठी होत आहे गर्दी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 20, 2022
411 4
0
571
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला कोल्हापुरात सुरुवात

पहिल्या दिवशी तब्बल 6 मेट्रिक टन आंब्यांच्या विक्रीतून सव्वा 6 लाखांची उलाढाल

विविध प्रजातींच्या आंब्यांची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

आंब्यांच्या असंख्य प्रजातींची कलमे येथे उपलब्ध

कोल्हापूर l प्रतिनिधी l आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरात कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात श्री शाहू छत्रपती मिलमध्ये शाहू महाराजांच्या विचारावर आधारित विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान आजपासून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पणन विभागाचे उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे तसेच कृतज्ञता पर्व समितीचे सदस्य उपस्थित होते.

आपण कधी हापूस आंब्याची वाईन टेस्ट केली आहे का ? आपल्या आवडत्या फळाची वाईन घरच्याघरी कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढी पुढे नेण्यासाठी हे कृतज्ञता पर्व आयोजित केले आहे. विविध उपक्रमांबरोबरच विकेल ते पिकेल व या संकल्पनेवर आधारित ‘जत्रा आंब्याची’ घेण्यात येत आहे. बांधावरुन थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असे सांगून माफक दरात उपलब्ध केलेल्या या आंबा जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले आहे.

या आंब्याच्या जत्रेत विविध प्रजातीचा आंबा म्हणजेच देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दुधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम आदी सह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे या जत्रेत उपलब्ध आहेत.

तब्बल 6 मेट्रिक टन आंब्यांची विक्री: सव्वा 6 लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल आंब्यांच्या जत्रेत 18 हून अधिक प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. याठिकाणी 18 उत्पादकांचे 18 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी तब्बल 6 मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली असून यातून अंदाजे सव्वा 6 लाखांहून अधिक रक्कमेची उलाढाल झाली असल्याची माहिती उप सरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले यांनी दिली.

आंबा खरेदीसाठी पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद – आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे आंबा उत्पादक भारावून गेले.

उत्पादकांनी मानले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आभार – आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाल्यामुळे आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आभार मानले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismKolhapurMahaparyatan.commaharashtra tourismMango saleआंबा जत्राकृषी पर्यटनजिल्हाधिकारी राहूल रेखावारविविध प्रजातींचे आंबे
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In