Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समृद्धीचा राजमार्ग – डॉ. बी. डी. जडे

वनक्षेत्राच्या अनुरूप विकासकामे करा... उपमुख्यमंत्री अजित पवार

मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्यादरम्यान मेट्रोची ट्रायल रन यशस्वी

ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समृद्धीचा राजमार्ग – डॉ. बी. डी. जडे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 2, 2022
415 4
0
576
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

साईकृपा ठिबक एजन्सी आयोजित पीक परिसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोळप्रिंपी ता. पारोळा (प्रतिनिधी) – पारंपारीक शेतीमध्ये पिकांचे उत्पादन कमी का मिळते कारण लागवडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता अवधी ३० ते ४० टक्के मिळत असल्याने पारंपारिक पद्धतीने पिकांचे उत्पादन कमी मिळते व नफा ही कमी मिळतो. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने निविष्ठांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळेल त्यामुळे उत्पादन अधिक मिळून आर्थिक फायदा अधिक मिळेल. 

राज्यामध्ये पाण्याची टंचाई विजेची टंचाई, मजुरांची उलब्धता, खतांची टंचाई ह्या मोठ्या समस्या शेतीमध्ये आहेत ह्या समस्यांवर उपाय ठिबक सिंचन तंत्रज्ञान असुन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ठिबक सिंचन तंत्र राजमार्ग आहे असे जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे कोळपिंप्री ता. पारोळा येथे साईकृपा ठिबक एजन्सी आयोजित पीक परिसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

व्ही. एम. पाटील यांच्या मोसंबी, आंबा, केळी, गहू,  हरभरा पिके असलेल्या शेतांमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. बी. डी. जडे ह्या कापूस आणि मका लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल आणि बगायती कापूस पिकाचे ठिबक सिंचन पद्धतीवर एकरी २० क्विंटल तसेच मका पिकाचे एकरी १०० क्विंटल उत्पादन कसे मिळविता येईल आणि एकाच पिकासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच १२५ पेक्षा अधिक पिकांसाठी कसा वापर करता येईल ठिबक मधून पाण्यात विरघळणारी खते कशी द्यावीत ह्यावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भरत वारे ह्यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. 

जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे ह्यांनी ठिबक सिंचन कसा निवडावा, संच दीर्घकाळ कार्यरत राहण्याकरीता गुणवत्ता कशी असावी, पाण्याच्या अचुक व्यवस्थापनाकरीता ऑटोमेशन तंत्राचा वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. ठिबक सिंचनद्वारे जमीन फक्त वाफसा अवस्थेत ठेवावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य रोहीदास दाजी होते. 

त्यांनी शेतकऱ्यांनी ठिबकमधुन फक्त पाणी न देता पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर म्हणजे फर्टिगेशन करावे. 

पारोळा पंचायत समितीचे उपसभापती अशोक नगराज पाटील, दहीवेलचे प्रगतीशील शेतकरी शिवाजी सुकदेव पाटील, गणेश पाटील तसेच कोळप्रिंपी परिसरातील अनेक शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक साईकृपा ठिबकचे संचालक सुदामभाऊ ह्यांनी केले. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन संजीव भोई यांनी केले. विक्री अभियंता यांनी आभार मानले.

Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJain HillskonkanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In