Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी… छगन भुजबळ

मुंबईतील ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा ; सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

अणुऊर्जेसह व्यापार, पर्यटन व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास अर्जेंटिना उत्सुक : ह्यूगो जेवियर गोबी... अर्जेंटिनाचे राजदूत 

सृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी… छगन भुजबळ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 11, 2021
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी लवकरच ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ वन्यजीव अपंगालय

वन्यजीवांसाठी उभारण्यात येणारे हे अपंगालय वन्यप्राण्याच्या जीवदानासाठी वरदान ठरेल

Gandhi Tirtha – Jain Hills

वन्यजीव अपंगालयाच्या प्रस्तावित ईमारतीचे भूमीपूजन

गांधीतीर्थ, जैन हिल्स, जळगाव

नाशिक : पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यात शासनस्तरावर सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ वन्यजीव अपंगालय उभारण्यात येत असून ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. सृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.                                                             

वन्यजीव सप्ताहांतर्गत आज म्हसरूळ येथील निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ या प्रस्तावित ईमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनरक्षक पूर्व तुषार चव्हाण, उपवनरक्षक पश्चिम पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे तसेच वनविभागातील इतर पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा वनविभागांतर्गत नाशिक, त्र्यंबक, ईगतपुरी, सिन्नर, पेठ, बा-हे, हरसुल, ननाशी असे एकूण ८ वनक्षेत्र असून, दिंडोरी, निफाड व सुरगाणा या तालुक्यांचा अंशत: समावेश होतो. जिल्ह्यातील पश्चिम विभाग क्षेत्रात प्रामुख्याने बिबट, तरस, कोल्हा, ससा, मोर, माकड, उद मांजर इत्यादी वन्यप्राणी आढळून येतात. तसेच नाशिक, सिन्नर व इगतपुरी वनक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या अपंगालयाच्या माध्यमातून जखमी व आजारी वन्यप्राणी व पक्षी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, वन्यजीवांसाठी उभारण्यात येणारे हे अपंगालय वन्यप्राण्याच्या जीवदानासाठी वरदान ठरेल, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

वन्यप्राणी बिबटासाठी ८ पिंजरे, वाघासाठी २ पिंजरे, कोल्ह्यासाठी ५ पिंजरे तसेच माकड व हरिण या प्राण्यासाठी दोन पिंजरे असणार असून, या सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळा स्वतंत्र विभागही असणार आहे. त्याबरोबरच उभारण्यात या अपंगालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष अति दक्षता विभाग, अन्न व औषंधांच्या उपलब्धतेसाठी साठवण गृह इत्यादींचीही सोय करण्यात येणार आहे. सदर वन्यजीव अपंगालय ईमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 4 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरुन उपचारा अभावी कोणताही वन्यप्राणी मृत पावणार नाही व वन्यप्राणी संख्या देखील अबाधित ठेवता येईल, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी योवेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा सन्मान:

यावेळी वन्यप्राण्यांच्या जतन व संवर्धनासाठी ग्रामीण भागात वन विभागांतर्गत स्थानिक लोकांच्या मदतीने संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत वनीकरण, वनसंरक्षक, वन वनवा प्रतिबंधक, वन्यप्राणी व पक्षी यांना जीवदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांपैकी जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार 51 हजार गाव चिमणपाडा, द्वितीय पुरस्कार 31 हजार सुरगाणा तालुक्यातील निंबरपाडा, तृतीय पुरस्कार 11 हजार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाव हर्षवाडी यांना प्राप्त झाला असल्याने या पुरस्कार्थींचा यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह तसेच धनादेश व पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In