Saturday, August 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्हॅकेशन होम, पर्यटन अपार्टमेंट, पर्यटन व्हिला व होमस्टेची नोंदणी करण्याचे आव्हान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 2, 2026
395 4
0
548
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आवाहन

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाकडून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यटकांना सुरक्षित, अधिकृत आणि दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हॅकेशन होम, पर्यटन अपार्टमेंट, पर्यटन व्हिला आणि होमस्टे यांसारख्या निवास प्रकारांची अधिकृत नोंदणी पर्यटन संचालनालयामार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या उपक्रमातून पर्यटकांना स्थानिक जीवनशैली, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पाहुणचाराचा अनुभव घेता येईल. तसेच, नोंदणीकृत निवासस्थळांना ‘पर्यटन मान्यता प्रमाणपत्र’ देण्यात येते, ज्यामुळे पर्यटकांचा विश्वास वाढतो व सुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता यासाठी शासनाने ठरवलेल्या मानकांचे पालन सुनिश्चित होते, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रातील गुणवत्ता वाढते. या नोंदणी केल्यामुळे पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि प्रचार माध्यमांवर प्रसिद्धी मिळते. शासनाच्या पर्यटनविषयक विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, सबसिडी, आणि प्रोत्साहनपर उपक्रमांचा लाभ घेता येतो.

या उपक्रमासाठी प्रधान सचिव आणि पर्यटन संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव हे प्रयत्नशील असून इच्छुक व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, नाशिक – पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक (४२२००१) येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक (०२५३) २९९५४६४ / ८३९०७३१७३७, ई-मेल ddtourism.nashik-mh@gov.in, तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व मालक, ऑपरेटर व स्थानिक नागरिकांनी आपल्या निवास सुविधांची नोंदणी पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयात करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In