स्पेनमध्ये शुभेच्छा संदेश फ्लॅग घेऊन केले विशेष स्कायडायव्हिंग
जैन इरिगेशनचे चेअरमन प्रख्यात उद्योगपती अशोक जैन यांचं या खास शुभेच्छा मोहिमेस सहकार्य- शीतल महाजन या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध भारतीय स्कायडायव्हर – शीतल महाजन यांनी जगातील सर्वात प्रसिद्ध स्कायडायव्हिंग ड्रॉप झोनपैकी एक असलेल्या स्कायडायव्ह एम्पुरियाब्रावा येथे एक चित्तथरारक स्कायडायव्हिंग केले. हवेतच फडकावला,8 फूट x 6 फूट संदेश बॅनर ध्वज “भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी, तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”-
स्कायडायव्हिंग हा नेहमीच भारताच्या धैर्य आणि दृढनिश्चयाच्या भावनेचे अभिव्यक्त करण्याचा माझा मार्ग – आणि नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल आणि राष्ट्रासाठी त्यांच्या अथक सेवेबद्दल आदर आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून ही उडी समर्पित करते- शीतल महाजन यांची उस्फुर्त प्रतिक्रिया प्रख्यात भारतीय उद्योगपती रतन टाटा आणि टाटा सन्स, जैन फाउंडेशन आणि भवरलाल जैन, आणि रिलायन्स फाउंडेशन आणि नीता अंबानी यांच्या सहकाऱ्यानं, शीतल महाजन यांनी केलंय, जगातील चारही ध्रुवांवर, स्कायडायव्हिंगचं जागतिक रेकॉर्ड- हे विशेष स्कायडायव्हिंग शुभेच्छा केवळ साहसी खेळांच्या जागतिक व्यासपीठावर भारताची उपस्थिती अधोरेखित करत नाही – तर जगभरातील भारतीय महिलांची शक्ती, लवचिकता आणि कामगिरी दर्शविणारी “आझादी का अमृत काल” ही भावना देखील प्रतिबिंबित करते
